शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

स्कीन लोशनऐवजी आले 19 हजारांचे Headphones; नंतर सांगितले “नॉन-रिटर्नेबल” 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2020 09:02 IST

अमेझॉनवरून चुकीने आलेले हेडफोन्स परत करण्यासाठी गौतम रेगे यांनी अ‍ॅमेझॉन कस्टमर केअरशी संपर्क साधला. मात्र...

ठळक मुद्देगौतम रेगे यांनी केलेले हे ट्विट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आतापर्यंत या ट्विटला 19 हजाराहून अधिक लाइक्स आणि 3 हजार रिट्विट आहेत.

ऑनलाइन ई-कॉमर्स वेबसाइट अमेझॉनवरून शॉपिंग केल्यानंतर अनेकदा अशा घटना घडल्या आहेत की, ग्राहकांनी ऑर्डर दिलेल्या वस्तूंऐवजी दुसऱ्याच वस्तू त्यांच्या घरी पोहोचल्या आहेत. 

अशाच प्रकार जोश सॉफ्टवेयरचे सह-संस्थापक आणि संचालक गौतम रेगे यांच्या बाबतीत घडला आहे. गौतम रेगे यांनी अमेझॉनवरून 300 रुपयांच्या स्कीन लोशनची मागणी केली, परंतु त्यांची जागा 19 हजार रुपयांच्या बोस कंपनीचे हेडफोन्स आले आहेत. याबाबतची माहिती त्यांनी ट्विटरवरुन दिली आहे.

विशेष म्हणजे, अमेझॉनवरून चुकीने आलेले हेडफोन्स परत करण्यासाठी गौतम रेगे यांनी अ‍ॅमेझॉन कस्टमर केअरशी संपर्क साधला. मात्र, अमेझॉनने त्यांना ते हेडफोन्स स्वत:कडे ठेवण्यास सांगितले. गौतम रेगे यांना ती वस्तू “नॉन-रिटर्नेबल” आहे, असे उत्तर अमेझॉनचे आले आहे.

दरम्यान, गौतम रेगे यांनी ही माहिती ट्विटरवर पोस्ट केल्यामुळे अनेक जण आश्चर्यचकित झाले आणि त्यांच्या ट्विटला मजेशीर रिट्विट करत आहेत. ट्विटरवर एका युजर्सने विचारले, "स्कीन लोशन अजूनही स्टॉकमध्ये आहे का? कृपया मला लिंक पाठवा." तर दुसऱ्या युजर्सने म्हटले आहे की, "हॅलो, मला बोस हेडफोनच्या जागी चुकून त्वचेचे लोशन मिळाले. कृपया देवाणघेवाण करा."

गौतम रेगे यांनी ट्विटरवर एक फोटो पोस्ट केला आहे. ज्यात एका बॉक्समध्ये बोस कंपनीचे वायरलेस हेडफोन्स आहेत. या हेडफोन्सची ऑनलाइन किंमत 19 हजार रुपये होती. दरम्यान, गौतम रेगे यांनी केलेले हे ट्विट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आतापर्यंत या ट्विटला 19 हजाराहून अधिक लाइक्स आणि 3 हजार रिट्विट आहेत.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेamazonअ‍ॅमेझॉनonlineऑनलाइन