World's Most Expensive Tear: दु:खं झालं किंवा आनंद झाला तर डोळ्यातून अश्रू येतात. अश्रू येणं ही एक नॅचरल प्रोसेस आहे. अश्रू निघाल्यानं डोळे साफ होतात आणि मन हलकं होतं. पण अश्रू विकले जातात किंवा त्यांना मोठी किंमत मिळते, असं कुणी सांगितलं तर सहजपणे विश्वास बसणार नाही. मात्र, असं होत आहे. पण ही किंमत मनुष्यांच्या नाही तर उंटाच्या अश्रूंना मिळत आहे.
राजस्थानची शान असणारे उंट आता केवळ शेतीच्या कामासाठी किंवा ओझं वाहण्यासाठी राहिले नाहीत. कारण बिकानेरच्या नॅशनल रिसर्च सेंटर ऑन कॅमल (NRCC) च्या एका रिपोर्टमधून आश्चर्यकारक बाब समोर आली आहे. या रिसर्चनुसार, उंटाचे अश्रू आणि त्यांच्या इम्यून सिस्टीममधून मिळणारे अॅंटी-बॉडी आता मनुष्यांचा जीव वाचण्यासाठी कामात येऊ शकतात. खासकरून सापाच्या विषाच्या उपचारात.
NRCC च्या अभ्यासकांनी उंटांना सॉ-स्केल्ड वायपर या विषारी सापाच्या विषानं इम्युनाइज करण्यात आलं. त्यानंतर उंटाचे अश्रू आणि रक्तातून काढण्यात आलेल्या अॅंटीबॉडीज टेस्ट करण्यात आल्या. याचा प्रभाव सकारात्मक दिसून आला. या अॅंटीबॉडीज रक्त वाहणं आणि रक्ताच्या गाठी तयार होण्याची प्रक्रिया सामान्य करण्यात फायदेशीर दिसल्या.
दरवर्षी मरतात ५८,००० लोक
भारतात दरवर्षी ५८ हजारांपेक्षा जास्त लोक सापाच्या विषानं आपला जीव गमावतात. जवळपास १.४ लाख लोक अपंग होतात. हे प्रमाण जगात सगळ्यात जास्त आहे. गाव आणि खेड्यापाड्यांमध्ये योग्य वेळेवर उपचार मिळत नसल्यानं हे जीव जातात. अशात उंटातून मिळत असलेला हा नवा उपाय स्वस्त, सुरक्षित आणि प्रभावी पर्याय ठरू शकतो.
हा रिसर्च केवळ उपचारासाठी महत्वाचा नाही तर उंट पालक शेतकऱ्यांसाठीही फायदेशीर आहे. बिकानेर, जैसलमेर आणि जोधपूरसारख्या भागांमधील उंट पालक उंटाच्या अश्रूचे आणि रक्ताचे सॅम्पल देण्याच्या बदल्यात ५ हजार ते १० हजार रूपये महिना कमाई करत आहेत.
उंट आता केवळ वाळवंटात ओझं वाहणारा प्राणी नाही तर जीवनदान देणारा प्राणी ठरत आहे. या शोधानं ग्रामीण भागात विकास आणि स्थानिक जीवांचं महत्वही दाखवलं आहे. येत्या काळात उंट हजारो भारतीयांचा जीव वाचवू शकतात.