शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

लॉटरीचे 2 कोटी रुपये घ्यायला गेला अन् दुसऱ्या देशात अडकला, वाचा नेमकं काय आहे प्रकरण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2022 11:07 IST

लॉटरीचे पैसे मिळवण्यासाटी दोन मित्रांना पाठवले, त्यांनाही पोलिसांनी अटक केले.

तुम्ही लॉटरीचे तिकीट खरेदी केले, त्यात तुम्ही कोट्यवधी रुपये जिंकले, पण काही कारणास्तव तुम्हाला पैसे मिळाले नाही तर? अशावेळी तुमची अवस्था काय असेल? अशीच एक घटना अल्जेरियातील एका व्यक्तीसोबत घडली आहे. त्या व्यक्तीने एक लॉटरीचे तिकीट खरेदी केले, त्यात त्याला 2 कोटी रुपयांचे बक्षीस मिळाले. पण, पैसे मिळू शकले नाहीत...

...यामुळे पैसे मिळाले नाहीमिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण अल्जेरियातील एका व्यक्तीशी संबंधित आहे. त्याने बेल्जियममध्ये एक लॉटरीचे तिकीट खरेदी केले होते. त्या लॉटरीत त्याला 2 कोटी रुपयांचे बक्षीस मिळाले. पण, त्याला लॉटरी कंपनीने पैसे देण्यास नकार दिला. या नकाराचे कारण म्हणजे, त्या व्यक्तीचा बेल्जियममध्ये कायमचा पत्ता नाही. तसेच, त्याचे बेल्जियममध्ये बँक खातेही नाही. त्यामुळेच कंपनीने पैसे देण्यास नकार दिला.

दोन मित्र पोलिसांच्या ताब्यातपुरस्काराची रक्कम मोठी असल्यामुळे ती रोख स्वरूपात दिली जाऊ शकत नाही. यासाठी कंपनीने त्याला बँक खाते मागितली होते. दरम्यान, त्या व्यक्तीच्या बेल्जियममधील दोन मित्रांनी त्याचे पैसे मिळवण्याचा प्रयत्न केला. पण चोरीच्या संशयावरुन पोलिसांनी त्या दोघांना तुरुंगात टाकले. नंतर सर्व माहिती समजल्यावर त्यांची सुटकाही करण्यात आली.

लॉटरीचा वाद न्यायालयातआता हे लॉटरीचे तिकीट कोर्टात जमा झाले आहे. बेल्जियमच्या मीडियानुसार, अल्जेरियन व्यक्तीने 4 महिन्यांपूर्वी आपला देश सोडला होता. तो बोटीने स्पेनला पोहोचला, त्यानंतर तो स्पेनहून फ्रान्समार्गे पायी चालत बेल्जियमला ​​पोहोचला. त्या व्यक्तीचे वकील अलेक्झांडर व्हर्स्ट्रेट म्हणाले की, बँक खाते नसल्यामुळे लॉटरी कंपनी पैसे देण्यास नकार देत आहे. आता यावर कोर्टात सुनावणी होणार आहे.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेInternationalआंतरराष्ट्रीयMONEYपैसा