'या' निळ्या डोळ्यांच्या टरबूजवाल्याने तरूणींना केलं घायाळ, सोशल मीडियावर धुमाकूळ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2018 11:45 AM2018-06-06T11:45:46+5:302018-06-06T11:45:46+5:30

निळे डोळे असलेल्या तरूणाचे फोटो व्हायरल होत आहेत.

After ‘chai wala’, Pakistan crushes on ‘tarbooz wala’ as his pics go viral | 'या' निळ्या डोळ्यांच्या टरबूजवाल्याने तरूणींना केलं घायाळ, सोशल मीडियावर धुमाकूळ

'या' निळ्या डोळ्यांच्या टरबूजवाल्याने तरूणींना केलं घायाळ, सोशल मीडियावर धुमाकूळ

Next

नवी दिल्ली- काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर पाकिस्तानमधील निळ्या डोळ्यांच्या एका तरूणाचे फोटो तुफान व्हायरला झाले होते. पाकिस्तानमध्ये चहा विकण्याचा व्यवसाय तो तरूण करत होता. निळ्या डोळ्यांच्या त्या तरूणाने सोशल मीडियावर धुमाकूळ घालत तरूणींना चांगलंच घायाळ केलं होतं. इतकंच नाही, तर त्या तरूणाला सिनेमाच्या ऑफरही आल्या होत्या. आता पुन्हा एकदा अशाच एका निळे डोळे असलेल्या तरूणाचे फोटो व्हायरल होत आहेत. हा तरूण पाकिस्तानमधील असून सोशल मीडियावर तरूणींचा नवा क्रश आहे. मोहम्मद अवैस असं या तरूणाचं नाव असून पाकिस्तानमधील कराचीमध्ये तो राहके. पाकिस्तानमधील कराचीमध्ये फुटपाथवर कलिंगड कापणाऱ्या तरूणाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 



 

सोशल मीडियावर तरूणींचा नवा क्रश असलेल्या या निळ्या डोळ्यांच्या तरूणाचे फोटो कराचीमधील रस्त्यावर इफ्तारच्या वेळी क्लिक करण्यात आले आहेत. सुरूवातीला हा तरूण कलिंगड विक्रेता असल्याचा समज सगळ्यांना झाला होता पण नंतर तो कलिंगड विक्रेता नसू वैद्यकिय क्षेत्रात शिक्षण घेत असल्याचं वृत्त गल्फ न्यूजने दिलं आहे. इफ्तारच्या वेळी लोकांना वाटण्यासाठी कलिंगड कापत होता, त्यामुळे तो कलिंगड विक्रेता असल्याचा समज झाला. 

मोहम्मदला मिळालेली प्रसिद्धी व तो कलिंगड विक्रेता असल्याचा लोकांचा समज लक्षात घेऊन मोहम्मदच्या मित्राने फेसबुकवरून मोहम्मदबद्दलची माहिती दिली. मोहम्मद वैद्यकिय शाखेतून शिक्षण घेत असल्याचं त्यांनी सांगितलं.  इंडियन एक्स्प्रेसनुसार, मोहम्मद हा झिआद्दिन महाविद्यालयातून एमबीबीएस शिकतो आहे.
 

Web Title: After ‘chai wala’, Pakistan crushes on ‘tarbooz wala’ as his pics go viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.