A place where boys leave their home after marriage: जगात वेगवेगळ्या संस्कृती फॉलो करणारे लोक राहतात. त्यांचे रितीरिवाज वेगवेगळे असतात. मग ते सणावाराचे असो वा लग्न समारंभाचे असोत. पण गोष्ट तुम्ही नोटीस केली असेल की, आपल्या देशात असो वा इतर कोणत्या देशात असो, प्रत्येक धर्मात मुलीला लग्नानंतर आपलं घर सोडून जावं लागतं. जास्तीत जास्त ठिकाणी हाच रिवाज आहे. पण तुम्हाला माहीत नसेल की, एक ठिकाण असं आहे जिथे लग्नानंतर मुलींना नाही तर मुलांना आपलं घर सोडावं लागतं. चला तर पाहुया काय आहे ही प्रथा आणि कुठे आहे.
कुठे आहे ही प्रथा?
जास्तीत जास्त लोकांना या ठिकाणाबाबत आणि या प्रथेबाबत माहीत नसेल. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, ही अनोखी प्रथा भारतातील मेघालय राज्यातील एका खास समाजात पाळली जाते. मेघालयाच्या चेरापुंजी भागातील खासी जमातीतील लोक ही प्रथा पाळतात. चेरापुंजी भागातील खासी जमातीमध्ये लग्न झाल्यावर मुलीऐवजी मुलाला घर सोडून मुलीसोबत रहायला जावं लागतं. पण पुढे काही दिवसांनी तो आपलं घर बदलतो.
महिलाच असतात मुख्य
या जमातीमध्ये आणखी एक जुनी परंपरा आहे. ज्या परंपरेनुसार सगळ्यात लहान मुलगी आई-वडिलांसोबत राहणार आणि त्यांची सेवा करणार. घरातील मोठ्या मुली घर सोडून वेगळ्या होऊ शकतात. पण त्यासाठीही एक निश्चित काळ ठरवण्यात आला आहे. त्यानंतरच त्या घर सोडू शकतात.
खासी जमातीमध्ये एक खास बाब अशीही आहे की, इथे घरात महिलाच मुख्य असतात. त्याशिवाय आणखी एक बाब म्हणजे जेव्हा संपत्तीची वाटणी होते, तेव्हा मुलांना कमी आणि मुलींना जास्त वाटा दिला जातो. यात सगळ्यात जास्त वाटा आई-वडिलांसोबत राहणाऱ्या लहान मुलीला मिळतो.