कोट्यवधीची कंपनी विकून ४० हजार गावकऱ्यांच्या मदतीला धावल्या जयश्री राव; वाचून अभिमान वाटेल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2022 13:03 IST2022-01-09T13:02:58+5:302022-01-09T13:03:17+5:30
७२ वर्षीय जयश्री राव या महाराष्ट्रातील पाचगणीत ग्रामपरी नावाची NGO चालवतात. लहानपणापासूनच जयश्री यांना समाजकार्याची आवड होती

कोट्यवधीची कंपनी विकून ४० हजार गावकऱ्यांच्या मदतीला धावल्या जयश्री राव; वाचून अभिमान वाटेल
समाजात बदल करण्याच्या गोष्टी अनेकजण करतात परंतु काही मोजकेच ते बदल घडवण्यासाठी योगदान देतात. महाराष्ट्रात राहणाऱ्या जयश्री राव याच त्याच लोकांपैकी एक आहेत. ज्यांनी स्वत:च्या सुखसुविधा, कोट्यवधीची कंपनीसोडून गावात येऊन राहिल्या. गावकऱ्यांचे आयुष्य बदलण्यासाठी जयश्री राव यांनी स्वत:चं आयुष्य खर्ची घातलं. मागील १४ वर्षापासून त्या गावकऱ्यांसाठी काम करतायेत. जयश्री राव यांनी आतापर्यंत ४० गाव दत्तक घेतले असून ४० हजारांहून अधिक लोकांना स्वच्छ पाणीपुरवठा त्यांच्याकडून होतो.
७२ वर्षीय जयश्री राव या महाराष्ट्रातील पाचगणीत ग्रामपरी नावाची NGO चालवतात. लहानपणापासूनच जयश्री यांना समाजकार्याची आवड होती. १४ वर्षाची असताना त्या इनिशिएटिव्ह ऑफ चेंज या NGO शी जोडल्या. महात्मा गांधी यांचे नातू राजमोहन गांधी यांनी त्याची स्थापना केली होती. त्यानंतर राजमोहन यांच्याकडून प्रेरणा घेत जयश्री यांनी समाजात बदल करण्याचं काम सुरु केले. पाचगणीतील गावांमध्ये त्यांनी समाजसेवा करण्यास सुरुवात केली. तेव्हा NGO ची इमारत बांधणाऱ्या मजुरांच्या मुलांना शिक्षण देत असे. NGO सोबत त्यांनी १० वर्ष काम केले. त्यानंतर त्या बंगळुरुतील एका डेंटिस्टशी लग्न करुन तिथे शिफ्ट झाल्या आणि सर्वसामान्य आयुष्य जगू लागल्या.
जयश्री सांगतात की, माझे वडील उद्योगपती होते. इंजिनिअरगिंग टूल्स बनवण्याचा त्यांचा व्यवसाय होता. वडिलांमुळे मला त्याची माहिती मिळाली. मीदेखील या क्षेत्रात उतरले. हळूहळू उद्योग वाढू लागला. चांगली कमाई होऊ लागली. आमचे अनेक प्रॉड्क्टस लाखोमध्ये विक्री होऊ लागले. आम्ही खूप आनंदात जगत होतो. परंतु एकेदिवशी असं काही घडलं ज्यामुळे माझं संपूर्ण आयुष्य बदलून गेले. २००६ मध्ये ऑफिसमधून येताना एक भाजीवाला भेटला त्याच्याकडून भाजी घेताना मी भाव करत होती. तेव्हा अनेक वेळेनंतर तो मानला आणि भाजी घेऊन घरी पोहचली. परंतु मला जाणीव झाली मी जे काही केले ते चुकीचे आहे. इतक्या कमाईनं काय फायदा? एका गरिबाकडून ५ रुपयांसाठी दर कमी करुन घेतला.
कोट्यवधीची कंपनी २५ हजारांना विकली
२००७ मध्ये जयश्रीने कर्मचाऱ्यांना कंपनी २५ हजारांनी विकली आणि पुन्हा पाचगणी परतल्या, त्यांनी ग्रामपरी नावाची NGO स्थापन करत गावकऱ्यांसाठी काम करणं सुरु केले. अनेक लोकांना सरकारी योजनांबद्दल माहिती नाही. त्यामुळे त्यांना लाभ होत नाही. जयश्री राव यांनी गावकऱ्यांना सरकारी योजनांबाबत सांगणं सुरु केले. जिल्हा अधिकाऱ्यांना भेटून लोकांना फायदा पोहचवण्यासाठी झटल्या. यात अनेकांना सरकारी योजनांचा फायदा मिळाला.
जयश्री यांचे काम हळूहळू सुरु झाले. गावातील लोकांना त्यांच्यावर विश्वास वाढला. गावात लोकांना पिण्यासाठी पाणी मिळत नव्हतं. दूर पर्यंत पाण्यासाठी वणवण भटकावं लागत होते. त्यासाठी जयश्री राव यांनी पाण्याची समस्या दूर करण्यासाठी योजना बनवली. या डोंगराळ भागात पाण्यासाठी केवळ झरा सोर्स होता. परंतु झरा सुकल्यानंतर पाण्याची समस्या प्रखरतेने जाणवतं होती. त्यानंतर याच झऱ्याचा वापर करत अमेरिकेतील एका कंपनीच्या मदतीने जयश्री राव यांनी सिमेंट क्रॉंक्रिटचा ढाचा बनवत पाणी वाचवण्यास सुरुवात केली. त्यानंतर गावकऱ्यांना स्वच्छ पाणी मिळू लागलं.