शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
3
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
4
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
5
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
6
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
7
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
8
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
9
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
10
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
11
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
12
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
13
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
14
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
15
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
16
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
17
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
18
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
19
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
20
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!

हिंमतीला सलाम! ७ वर्षांची मुलगी लिंबू पाणी विकून स्वत:च्या सर्जरीसाठी जमा करतेय पैसे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2021 16:32 IST

पैसे जमा करण्यासाठी तिने जी आयडिया काढली ती सुद्धा वेगळी आहे. लीजा तिची आई एलिजाबेथच्या बेकरी मध्येच काम करत आहे.

ही ७ वर्षांची मुलगी तिच्या आईच्याच बेकरीमध्ये लिंबू पाणी विकत आहे. ती हे का करते हे वाचून अनेकजण भावूक होतील. लीजा स्कॉट असं या मुलीचं नाव असून तिच्या मेंदूवर लवकरच सर्जरी होणार आहे. आपल्या सर्जरीसाठी ती स्वत: जमा करत आहे. जेणेकरून तिच्या आईवरील खर्चाचं ओझं थोडं कमी होईल.

पैसे जमा करण्यासाठी तिने जी आयडिया काढली ती सुद्धा वेगळी आहे. लीजा तिची आई एलिजाबेथच्या बेकरी मध्येच काम करत आहे. अमेरिकेच्या अलबामामध्ये Savage बेकरीमध्ये लिंबू पाणी स्टॉल लावला आहे. लोक जेवढं जास्त लिंबू पाणी घेतील तिला तेवढी जास्त मदत होईल. (हे पण वाचा : VIDEO : सुपर मॉम! इमारतीला लागली आग, मुलांना वाचवण्यासाठी आईने केलं 'हे' काम!)

लीजाच्या आईने आपल्या मुलीच्या आजाराबाबत सांगितले की, 'तिच्या मेंदूमध्ये तीन ठिकाणी समस्या आहे. त्यामुळे मेंदूचा उजवा भाग सतत असामान्य असतो. त्यामुळेच तिला झटके येतात'.

साधारण ६ महिन्यांपूर्वी लीजाला इतके भयंकर झटके आले होते की, ती बेशुद्ध झाली होती आणि तिच्या मांसपेशींमध्ये तणाव आला आहे. नंतर समोर आले की, तिमा मेंदू खासप्रकारचा आहे. या आजाराला सेरेब्रल मॅलफॉर्मेशन असं म्हणतात. सामान्यपणे कोणत्याही प्रकारच्या सेरेब्रल मॅलफॉर्मेशनमध्ये डॉक्टरांना साधारणपणे एकप्रकारचंच मॅलफॉर्मेशन दिसतं. पण लीजाच्या केसमध्ये त्यांना तीन ठिकाणी अडचण दिसली. (हे पण वाचा : जुळे भाऊ ऑपरेशन करून बनल्या बहिणी, आजोबांनी प्रॉपर्टी विकून सर्जरीसाठी दिले पैसे!)

लीजा लवकरच तिच्या पहिल्या सर्जरीसाठी बॉस्टन चिल्ड्रन हॉस्पिटलमध्ये जाईल. इतक्या अडचणी असूनही लीजाची हिंमत कायम आहे. ती स्ट्रॉंग आहे. ती सांगते की, ती या अडचणीवर मात करेल. तिच्या आईने तिला हिंमत दिली आहे. ती नेहमीच तिला साथ देते.

आपल्या मुलीसाठी एलिजाबेथने इन्शुरन्सचा कवर वाढवला आहे. पण ट्रॅव्हल आणि हॉटेलचा खर्च, सोबतच औषधांचा खर्च याचा अधिक भार पडतो. आशा आहे की, एलिजाबेथच्या मदतीसाठी लोक लवकरच समोर येतील. जेणेकरून तिच्या मुलीची सर्जरी व्हावी आणि ती तिचं बालपण हसत-खेळत जगू शकेल. 

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टीAmericaअमेरिकाJara hatkeजरा हटके