आपल्यापैकी सगळ्यांनाच दोनवेळचं जेवण खायला मिळत असतं. पण देशात असे अनेक लोक आहेत जे उपाशीपोटीच झोपतात. त्यांना दोनवेळचं अन्न सुद्धा खायला मिळत नाही. अशा परिस्थितीत इतरांना काही देण्यासाठी पात्र असलेले लोक समाजातील गोरगरीबांची नेहमीच मदत करत असतात अशी अनेक उदाहरणं आपण पाहिली असतील. तामिळनाडूच्या ६३ वर्षाच्या आजोबांचे कार्य वाचून तुम्हाला नक्कीच अभिमान वाटेल.
हे आजोबा मागिल दीड वर्षांपासून गोरगरिबांना मोफत जेवण देत आहेत. यात आदिवासी जमातीच्या १५० मुलांचा समावेश आहे. माध्यामांनी दिलेल्या माहितीनुसार या बालाचंद्र नावाच्या आजोबांनी वयाच्या ६० वर्षापर्यंत व्यवसाय केला. नंतर त्यांनी गरजवंताना मदत करायचं ठरवलं. तामिळनाडूच्या पानप्पल्ली, कोंडानुर, जम्बुकंडी, कुट्टुपुली और थेक्कालूर या ठिकाणच्या आदिवासीयांना सकाळी ११ ते १२ या वेळेत जेवण देतात. इतकचं नाही तर हे आजोबा त्या आदिवासी परिवारांना अन्नधान्य सुद्धा वाटतात. ५ किलो तांदूळ आणि १ किलो डाळ देतात. बालाचंद्रा हे अशा लोकांची मदत जे वृध्द आहेत किंवा जे शारीरीक समस्येमुळे कोणतंही काम करू शकत नाही. ( हे पण वाचा-अभिमानास्पद! शाळेची वीज कापली म्हणून सातवीच्या मुलांनी 'अशी' लढवली शक्कल....)
बालाचंद्र असं सांगतात की वयाची ६० वर्ष त्यांनी खूप संपत्ती मिळवली आता त्यांना फक्त गोरगरीब लोकांची मदत करण्यासाठी आपलं जीवन घालवायचं आहे. कोयम्बतूर या ठिकाणी या आजोबांचं संपूर्ण कुटुंब असतं. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. या आजोबांचा मुलगा तेथिल हॉस्पीटलमध्ये एमडी आहे. ( हे पण वाचा-'या' आजीबाईचं इंग्रजी ऐकून शशी थरूरही म्हणतील... ठोको ताली)