शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
5
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
6
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
7
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
8
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
9
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
10
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
11
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
12
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
13
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
14
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
15
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
16
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
17
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
18
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
19
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
20
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश

अचानक खात्यात आले 57 कोटी, घर-गाडी खरेदी केले; नंतर झाली फजीती...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2022 18:22 IST

महिलेने मनमोकळेपणाने खर्च केला, पण नंतर सत्य समजताच तिची पायाखालची जमीन सरकली.

Viral News: तुमच्या खात्यात अचानक कोट्यवधी रुपये आले आणि तुम्ही त्यातून जमीन, घर, गाडी आणि इतर काही वस्तू खरेदी केल्या. पण, नंतर समजले की, ते पैसे चुकून आले आहेत आणि आता परत करावे लागणार, त्यावेळेस तुमची अवस्था काय असेल..? असाच प्रकार ऑस्ट्रेलियात राहणाऱ्या एका महिलेसोबत घडला. महिलेच्या खात्यात अचानक 10.5 मिलियन डॉलर (57 कोटींहून अधिक) आले. 

$100 ऐवजी 57 कोटी पाठवलेमिळालेल्या माहितीनुसार, क्रिप्टो ट्रेडिंग प्लॅटफॉर्म क्रिप्टो डॉट कॉमने थेवामनोगरी मॅनिवेल नावाच्या ऑस्ट्रेलियन महिलेच्या खात्यात चुकून 57 कोटींहून अधिक रक्कम जमा केली. त्या फर्मला महिलेच्या खात्यात फक्त $100 पाठवायचे होते, परंतु चुकून ऑस्ट्रेलियन $10.5 मिलियन पाठवले. विशेष म्हणजे, या फर्मला अनेक महिने याची माहितीच झाली नाही. क्रिप्टो डॉट कॉमला सुमारे 7 महिन्यांनंतर आपली चूक समजली. हा प्रकार कळताच कंपनीतील अधिकारी भानावर आले. 

7 महिन्यांनंतर समजला घोळमे 2021 मध्ये हे पैसे ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथे राहणाऱ्या या मॅनिवेलच्या खात्यात ट्रान्सफर केले होते आणि डिसेंबर 2021 मध्ये कंपनीला याची माहिती मिळाली. ही कंपनी फोरिस GFS नावाने ऑस्ट्रेलियामध्ये व्यवसाय करते. मॅनिवेलचे पेमेंट अयशस्वी झाल्यामुळे तिच्या खात्यात $100 परत करणे अपेक्षित होते, परंतु चुकून $10.5 मिलियन गेले. खात्यात अचानक 57 कोटी रुपये येणे मॅनिवेलसाठी धक्कादायक होते. मात्र याची खबर तिने कुणालाही कळू दिली नाही. द गार्डियनमधील वृत्तानुसार, या पैशातून महिलेने उत्तर मेलबर्नच्या पॉश क्रेगीबर्न भागात A$1.35 मिलियनमध्ये चार बेडरूमचे आलिशान घर विकत घेतले. याशिवाय तिने हे पैसे अनेक ठिकाणी बिंदास्तपणे खर्च केले. 

आता व्याजासह पैसे परत करावे लागणारकंपनीने महिलेविरोधात ऑस्ट्रेलियाच्या व्हिक्टोरियन सर्वोच्च न्यायालयात खटला दाखल केला. या फर्मला कोर्टाकडून मॅनिवेलचे खाते जप्त करण्याचे आदेश मिळाले, परंतु या महिलेने खात्यातील पैशांचा मोठा हिस्सा आधीच खर्च केला होता. यानंतर, फर्मने पुन्हा न्यायालयात धाव घेतली, ज्यावर मॅनिवेलने ज्या खात्यांमध्ये पैसे हस्तांतरित केले होते ती खाती गोठवण्याचे आदेश मिळाले. अचानक कोट्यवधी रुपयांची मालकिन बनलेल्या मॅनिवेलच्या अडचणीत वाढ होऊ लागली. तिला पैसे परत करण्याच्या नोटिसा येऊ लागल्या. आता महिलेला तिची मालमत्ता विकून पैसे लवकरात लवकर परत करावे लागणार आहेत. यासह, व्याज म्हणून $ 27,369.64 ची रक्कमदेखील द्यावी लागेल. 

टॅग्स :Australiaआॅस्ट्रेलियाJara hatkeजरा हटकेInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्स