‘लिव्ह इन’मध्ये तब्बल ५० वर्षे; विवाह ८०व्या वर्षी

By Admin | Updated: July 5, 2017 01:05 IST2017-07-05T01:05:55+5:302017-07-05T01:05:55+5:30

मध्यप्रदेशातील एक विवाह सद्या चर्चेत आहे. सुख कुशवाह (८०) आणि हरिया (७५) यांनी नुकतीच लग्नाची गाठ बांधली आहे. हे दोघे

50 years in Live Inn; Marriage at 80 year old | ‘लिव्ह इन’मध्ये तब्बल ५० वर्षे; विवाह ८०व्या वर्षी

‘लिव्ह इन’मध्ये तब्बल ५० वर्षे; विवाह ८०व्या वर्षी

इंदोर : मध्यप्रदेशातील एक विवाह सद्या चर्चेत आहे. सुख कुशवाह (८०) आणि हरिया (७५) यांनी नुकतीच लग्नाची गाठ बांधली आहे. हे दोघे गत ५० वर्षांपासून ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहत आहेत. त्याकाळी प्रेम विवाह करणे एवढे सोपे नव्हते.
घरातूनही प्रचंड विरोध झाला. अखेर त्यांनी विवाह न करता एकत्र राहण्याचे ठरविले. मध्यप्रदेशातील पाइतपुरा येथे राहणाऱ्या या दोघांना दोन मुले आणि दोन मुली आहेत. एक सुखी कुटुंब म्हणून यांच्याकडे पाहिले जाते. तरीही हरियाच्या मनात विवाह न केल्याची खंत होतीच.
आयुष्याची सायंकाळ होत असताना त्यांना असे वाटले की, मृत्यूनंतर आपल्याला मोक्ष कसा मिळणार? कारण, त्यांनी विधिवत विवाह केलेला नाही. त्यामुळे ३० जून रोजी त्यांनी विवाह केला. या निर्णयाने त्यांची मुलेही खूप आनंदी आहेत.

Web Title: 50 years in Live Inn; Marriage at 80 year old