Thailand Wedding: लग्न हे दोन व्यक्तींचं एक पवित्र बंधन मानलं जातं. सामान्यपणे एक पुरूष आणि एक महिला लग्न करून संसाराचा गाडा चालवतात. पण हल्ली लग्नाचा वेगळाच ट्रेंड बघायला मिळतोय. तो म्हणजे १ महिला एकाचवेळी अनेक पुरूषांशी लग्न करतात किंवा एकापेक्षा दोन पुरूष एकाच महिलेशी लग्न करतात आणि एकत्र राहतात. थायलँडमधून अशीच एक घटना समोर आली आहे. येथील ३७ वर्षीय महिला चर्चेत आली. कारण तिने एकाच लग्न मंडपात दोन ऑस्टियन पुरूषांसोबत लग्न केलं. हे दोन्ही पुरूष एकमेकांचे चांगले मित्र आहेत. इतकंच नाही तर महिलेला दोघांकडूनही चांगला हुंडाही मिळाला.
दोन पुरूषांसोबत लग्न
डुआंगडुआन केत्सारो नावाची ही महिला गायिका आणि गीतकार होती. पहिल्यांदा ती पटायामध्ये निवृत्त ऑस्ट्रियन पोलीस ऑफिसर रोमनला भेटली. नंतर ती मॅकीसोबत भेटली. जो आता ऑस्ट्रियन पोलीस ऑफिसर आहे आणि रोमनचा जवळचा मित्र आहे. या दोघांसोबतच्या रिलेशनशिपनंतर म्हणजे रोमनला पाच वर्षे आणि मॅकीला एक वर्ष डेट केल्यानंतर तिघांनी आपलं नातं ऑफिशिअल करण्याचा निर्णय घेतला.
खास बाब म्हणजे डुआंगडुआनचं आधी लग्न झालं होतं. या लग्नातून तिला तीन मुलं आणि दोन नातवंड आहेत. अनेक वर्ष तिने आपले आई-वडील आणि मुलांचा सांभाळ करण्यासाठी खूप मेहनत घेतली. आता हा दोघांची लग्न करण्याचा निर्णय घेण्याआधी तिने आई-वडील आणि मुलांसोबत संवाद साधला. सगळ्यांनी तिला लग्नासाठी परवानगी दिली. कारण दोन्ही पुरूषांनी वेळोवेळी परिवाराची काळजी घेतली होती. पुरूषांनी दिला हुंडा २८ फेब्रुवारीला तिघांनी थायलँडच्या प्रखोन चाय जिल्ह्यात लग्न केलं. यात केवळ जवळचे मित्र आणि नातेवाईकांना बोलवण्यात आलं होतं. लग्न पूर्णपणे थाई रितीरिवाजानुसार करण्यात आलं. लग्नानंतर दोन्ही नवरदेवांनी एका तलावात उडी मारत आनंद व्यक्त केला. दोघांनीही महिलेला लग्नासाठी १ मिलियन म्हणजे जवळपास २९ लाख रूपये हुंडा दिला.
महिलेच्या आईने सांगितलं की, तिने मुलीला अनेक वर्ष खूप अडचणींमध्ये पाहिलं आणि आता तिची इच्छा आहे की, मुलगी आनंदी रहावी आणि तिची काळजी घेतली जावी. नवरी यावेळी गंमतीने म्हणाली की, एक लग्न करा, कुणाला लक्षातही राहत नाही...एकत्र दोन लोकांसोबत लग्न करा, सगळेच लक्षात ठेवतील.
Web Summary : A 37-year-old Thai woman married two Austrian men, friends, in one ceremony after dating them. She received a dowry from both. The woman has three children from a previous marriage. Her family approved, wanting her happiness.
Web Summary : थाईलैंड में एक 37 वर्षीय महिला ने दो ऑस्ट्रियाई पुरुषों से शादी की, जो दोस्त हैं। महिला को दोनों से दहेज मिला। पहले विवाह से महिला के तीन बच्चे हैं। परिवार ने उसकी खुशी के लिए शादी की मंजूरी दी।