३६०० वर्षांआधी दारू पिण्यासाठी 'याचा' केला जायचा वापर? बघून व्हाल अवाक्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2019 17:04 IST2019-12-18T17:04:24+5:302019-12-18T17:04:44+5:30
त्या काळात मुख्य उत्सवांमध्ये श्रीमंत लोक त्यांच्या संपत्तीचा दिखावा करण्यासाठी मोठ-मोठ्या कार्यक्रमांचं आयोजन करत होते.

३६०० वर्षांआधी दारू पिण्यासाठी 'याचा' केला जायचा वापर? बघून व्हाल अवाक्...
(प्रातिनिधीक छायाचित्र)
तुम्हीही अनेकदा डिस्पोजल कप्सचा वापर केला असेलच. पण डिस्पोजल ग्लासेस ही आधुनिक जगाची देण नाही. हजारो वर्षांपूर्वीही यांचा वापर करत होते. ब्रिटनची राजधानी लंडनमधील संग्रहालयात ३६०० वर्ष जुना हॅंडन नसलेला एक डिस्पोजल कप ठेवण्यात आला आहे. संग्रहालयाने दावा केला आहे की, मिनोअन संस्कृतीत ग्रीसच्या क्रेते द्वीपावर मातीपासून तयार कपांचा वापर केला जात होता. हे कप एकदा वापरून फेकले जायचे.
असे सांगितले जाते की, या डिस्पोजल कपची निर्मिती १७०० ते १६०० काळखंडातील आहे. या कपांचा वापर करणारी मिनोअन संस्कृती २७०० ते १४५० पर्यंत अस्तित्वात होती. तज्ज्ञांनुसार, हजारो वर्षांआधी मातीपासून तयार या कपांचा वापर मद्यसेवनासाठी केला जात होता.
(Image Credit : Trustees of the British Museum)
ब्रिटिश संग्रहालयाची देखरेख करणाऱ्या जुलिया फर्ले सांगतात की, त्या काळात मुख्य उत्सवांमध्ये श्रीमंत लोक त्यांच्या संपत्तीचा दिखावा करण्यासाठी मोठ-मोठ्या कार्यक्रमांचं आयोजन करत होते. यात मातीपासून तयार कपांचा वापर केला जात होता. या कार्यक्रमांमध्ये मोठ्या संख्येने लोक यायचे. पण कुणालाही वापरलेली भांडी घासायची नसायची. त्यामुळे डिस्पोजल कपांचा वापर केला जायचा.
(Iamge Credit : iflscience.com)
असे म्हणतात की, ९० च्या दशकात डिस्पोजल कपांचा वापर वाढला. पण हजारो वर्षांआधी वापरले जाणारे हे पाहून म्हणता येईल की, डिस्पोजल कपांचा वापरही तेव्हाही केला जात होता. आता केवळ मातीच्या कपांऐवजी प्लास्टिकचे कप आले आहेत. जे पर्यावरणासाठी धोकादायक ठरत आहेत.