34 Snakes came out with serpent from the house in darbhanga | आंघोळ करताना सापाने व्यक्तीच्या पायालाच घातले वेटोळं, तर ३४ सापांची पिल्ल घरभर होती फिरत

आंघोळ करताना सापाने व्यक्तीच्या पायालाच घातले वेटोळं, तर ३४ सापांची पिल्ल घरभर होती फिरत

नुसते सापाचे नाव काढले तरी अंगावर शहारा येतो, साप बघितला तर बोबडी वळते. मात्र एका व्यक्तीला आंघोळ करत असताना चक्क सापानेच वेठीस धरल्याची घटना समोर आली आहे. आंघाळ करत असताना बाथरूमध्येच एका सापाने या व्यक्तीच्या पायालाच वेटोळ घातले. सापाला पाहून त्याची काय अवस्था झाली असणार याचा विचारही केला तरी धडकी भरते.

विनय झा नावाच्या व्यक्तीसह हा प्रकार घडला आहे. हा आंघोळ करत असताना  अचानक भला मोठा साप आला.कसाबसा तेथून त्याने स्वतःची सुटका केली. बाथरूममधून बाहेर येऊन पाहतो तर काय त्याच्या पुर्ण घरात सापाची पिल्लं फिरत होती. हे पाहून तो आणखीन घाबरला आणि शेजा-यांना हा सगळा प्रकार सांगितला. 

आश्चर्य म्हणजे घराच्या स्टाइलमध्ये हे सापाची पिल्लं लपून बसली होती. शेजा-यांच्या मदतीने या व्यक्तीने तातडीने सर्पमित्रांशी संपर्क साधला. सर्पमित्रानं संपूर्ण घर तपासल्यानंतर एक नाही, दोन नाही तर तब्बल 34 सापाची पिल्लं  शोधून काढली. घरात इतके साप आले तरी कसे याच विचाराने सारेच चिंतेत होते.गेल्या काही दिवसापासून  एक भली मोठी नागिन या घरात राहात होती.मात्र याची भनकही या व्यक्तीला आली नाही. तो इतके दिवस या सापांसह राहत असल्याचे समजताच त्याच्या पाया खालची जमीनच घसरली.

Web Title: 34 Snakes came out with serpent from the house in darbhanga

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.