शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

तीन फुटाची महिला पडली १३ वर्ष लहान मुलाच्या प्रेमात, सोशल मिडियावर केलं जातंय ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2022 15:54 IST

३ फुट उंची असलेल्या या महिलेचा बॉयफ्रेंड तिच्यापेक्षा १३ वर्षांनी लहान आहे. त्यामुळे या कपलला सोशल मीडियावर (Social Media) जोरदार ट्रोल (Troll) केलं जात आहे.

प्रेम (Love) ही सहजसुलभ भावना असते. प्रेमाला कोणत्याच गोष्टींचं बंधन नसतं. व्हॅलेंटाइन डे (Valentine's Day) हा प्रेम व्यक्त करण्याचा दिवस. जगभरात हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा होतो. या दिवशी कपल्स (Couples) एकमेकांविषयी मनात असलेलं अव्यक्त प्रेम व्यक्त करतात, नव्या जीवनाला सुरुवात करतात. सध्या अमेरिकेतली (America) एक महिला आणि तिचा बॉयफ्रेंड प्रेम या विषयावरून जोरदार चर्चेत आहे. अर्थात यामागे महिलेची उंची (Physique) आणि तिचं प्रोफेशन या गोष्टी कारणीभूत आहेत. त्यातच या महिलेचा बॉयफ्रेंड तिच्यापेक्षा १३ वर्षांनी लहान आहे. त्यामुळे या कपलला सोशल मीडियावर (Social Media) जोरदार ट्रोल (Troll) केलं जात आहे. याविषयीचं वृत्त 'आज तक'ने दिलं आहे.

अमेरिकेतली ३२वर्षांची सॅसी केसी (Sassee Cassee) आणि तिचा बॉयफ्रेंड ब्लेक (Blake) या कपलवर सध्या जोरदार टीका होत आहे. सॅसीची उंची केवळ २ फूट १० इंच आहे तर तिचा बॉयफ्रेंड ब्लेकची उंची ५ फूट ७ इंच आहे. तसं पाहायला गेलं, तर शारीरिकदृष्ट्या ती दोघं एकमेकांना अनुरूप नाहीत. सॅसी एका बारमध्ये नोकरी करते. कमी उंची असलेल्या सॅसीचा बॉयफ्रेंड तिच्यापेक्षा १३ वर्षांनी लहान आहे. त्यामुळे अशा दोन्ही कारणांनी हे कपल ट्रोल होत आहे.

आपल्या नात्याविषयी सॅसी म्हणते, की 'माझं ब्लेकवर जीवापाड प्रेम आहे. ब्लेक माझी काळजी घेतो. गेल्या वर्षी फेसबुकवर (Facebook) आमची ओळख झाली होती. एक महिना डेटिंग केल्यानंतर आम्ही एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. गेल्या वर्षभरापासून आम्ही दोघं एकत्र राहत आहोत.'

'डेली स्टार'च्या वृत्तानुसार, सॅसी लहान असताना, डॉक्टरांनी तिला Cartilage-Hair Hyperplasia हा आजार असल्याचं निदान केलं. या आजारात हाडांची लांबी वाढत नाही. त्यामुळे माणसाची उंचीदेखील वाढत नाही. सॅसीची उंची सामान्य व्यक्तीच्या तुलनेत खूपच कमी आहे; पण तिनं कधीच या आजाराला (Disease) आपली कमजोरी बनू दिली नाही. इन्स्टाग्रामवर सॅसी केसीचे (sasseecassee89) दोन लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. इन्स्टाग्रामवरचे (Instagram) तिच्या फोटोज आणि व्हिडिओजवर हजारो-लाखो जण प्रतिक्रिया देत असतात.

'आमच्या नात्यावरून लोक आम्हाला ट्रोल करत आहेत', असं या कपलनं म्हटलं आहे. सोशल मीडियावर त्यांना खूप द्वेषपूर्ण कमेंट्सचा सामना करावा लागत आहे. असं असूनही सॅसी आणि ब्लेक एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. हे दोघं एकमेकांवर खूप प्रेम करतात. तसंच ब्लेक सॅसीशी लग्न करू इच्छित आहे. 'सॅसी ही खूप हळव्या स्वभावाची स्त्री आहे. ती मला आनंदी ठेवते, हीच माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. मला तिच्या कमी उंचीची, माझ्या वयाची आणि तिच्या नोकरीची पर्वा नाही,' असं ब्लेक नमूद करतो. एकमेकांच्या सहवासात आनंदी असलेल्या कपलला मात्र इतरांच्या टीकेचा सामना करावा लागत आहे.

टॅग्स :Jara hatkeजरा हटके