मेकअपवर ३ कोटी खर्च; मॉडेल झाली कंगाल, बनली टॅक्सी ड्रायव्हर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2023 06:22 IST2023-04-30T06:22:09+5:302023-04-30T06:22:34+5:30

पतीने तिच्याकडील कार, बंगला, बँक बॅलन्स सर्व काढून घेतले. पतीकडून पोटगी मिळावी म्हणून कोर्टात केस केली होती, पण ती केस देखील हरली

3 crore spent on makeup; Model Nannette Hammond turned taxi driver | मेकअपवर ३ कोटी खर्च; मॉडेल झाली कंगाल, बनली टॅक्सी ड्रायव्हर

मेकअपवर ३ कोटी खर्च; मॉडेल झाली कंगाल, बनली टॅक्सी ड्रायव्हर

महागड्या गाड्यांमधून फिरून आलिशान जीवन जगणाऱ्या मॉडेलवर आता टॅक्सी चालक म्हणून काम करण्याची वेळ आली आहे. एकेकाळी बार्बी डॉलसारखे दिसण्यासाठी कॉस्मेटिक सर्जरीवर ३ कोटींहून अधिक खर्च करणारी ती आता कंगाल झालीये. 

अमेरिकन मॉडेल नॅनेट हॅमंड लोशियावो एकेकाळी प्रसिद्ध प्लेबॉय मासिकाची मॉडेल होती. एका अतिशय श्रीमंत माणसाशी लग्न केल्यानंतर अनेक महागड्या गाड्या, एखाद्या आलिशान महालासारख्या घरात ती विलासी जीवन जगत होती. पण, अलीकडेच पतीसोबत घटस्फोट झाला आणि तिचे आयुष्यच बदलले. पतीने तिच्याकडील कार, बंगला, बँक बॅलन्स सर्व काढून घेतले. पतीकडून पोटगी मिळावी म्हणून कोर्टात केस केली होती, पण ती केस देखील हरली आणि गेल्या आठवड्यातच उबेरमध्ये टॅक्सी चालक म्हणून नवीन जॉब सुरू केला आहे. सध्या ती एका छोट्या भाड्याच्या घरात राहते.

Web Title: 3 crore spent on makeup; Model Nannette Hammond turned taxi driver