शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपचा जीव टांगणीला! किंगमेकर नितीशकुमार, तेजस्वी यादव एकाच विमानात; दिल्लीला रवाना
2
"माझ्या नादी लागू नका, तुमचा कार्यक्रमच लावणार, सोडणार नाही"; मनोज जरांगेंचा इशारा
3
ज्यांनी सर्व्हेवर शिंदेंच्या खासदारांचे तिकीट कापले, त्या भाजपचे दोनच खासदार पुन्हा आले, बाकीचे...
4
मराठा आंदोलनाचा इम्पॅक्ट; बीडमधील विजयानंतर बजरंग सोनावणे मध्यरात्री मनोज जरांगेंच्या भेटीला
5
Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : "नरेंद्र मोदी हा ब्रँड संपला, त्यांना आधी शपथ घेऊ द्या, त्यानंतर..."; संजय राऊतांचे सूचक संकेत
6
T20 WC 24, IND vs IRE : भारताची कशी असेल प्लेइंग XI? रोहितने सांगितली रणनीती, समोर आयर्लंडचे आव्हान
7
लोकसभा निवडणूक: कोकणपट्ट्यात उद्धवसेनेला धक्का, ठाणे-तळकोकणातील बुरूज ढासळले!
8
Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : "अमोल किर्तीकरांची जागा ही समोरचे लोक जिंकलेले नाहीत, तर ती जागा चोरलेली आहे"
9
Lok Sabha Election Result 2024 : भाजपची मदार आता मित्रांच्या सहकार्यावर, चार राज्यांमध्ये मोठा फटका
10
दारुण पराभवानंतर महायुतीत वादाचे फटाके, बारामतीत शिंदे गट, भाजपाची मतं ट्रान्सफर झाली नसल्याचा अजित पवार गटाचा आरोप
11
टीम इंडियाचा 'हेड' नक्की कोण? गंभीरनं व्यक्त केली इच्छा अन् गांगुलीचं मोठं विधान
12
अयोध्येत BJP चा पराभव पाहून अनुपम खेर यांची पोस्ट; म्हणाले, "प्रामाणिक व्यक्तीलाच..."
13
पत्नीच्या नावे उघडा NPS अकाऊंट, महिन्याला ₹५००० गुंतवा; ₹४४७९३ चं पेन्शन, मॅच्युरिटीवर मिळतील ₹१,११,९८,४७१
14
Lok Sabha Election Result 2024 : "उ. बा. ठा चा मुंबईत झालेला विजय हा भगवा नाही तर हिरवा विजय"
15
आजचे राशीभविष्य, ५ जून २०२४: आजचा दिवस उत्साहात, आनंदात जाईल. व्यापारात लाभ होईल!
16
Share Market Open : मंगळवारच्या घसरणीनंतर आज सेन्सेक्स-निफ्टीत तेजी; एचयूएल वधारला, हिंदाल्कोमध्ये घसरण
17
Lok Sabha Election Result 2024 : १९ मंत्र्यांना पराभवाचा धक्का; स्मृती इराणी, रावसाहेब दानवे, कपिल पाटील आणि भारती पवार पराभूत
18
TV Channel Price Hike: खिशाला कात्री, टीव्ही चॅनेल्स होणार महाग; 'इतक्या' रुपयांनी वाढणार किंमत
19
जय हो...! लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर मराठी अभिनेत्याने केलं भाजपाचं अभिनंदन, शेअर केला PM मोदींचा 'तो' फोटो
20
Adaniनी सहा महिन्यात कमावले, त्याच्या दुप्पट एका दिवसात गमावले; मुकेश अंबानींच्या नेटवर्थमध्येही मोठी घसरण

डिटर्जेंट पावडरमधून महिला करत होती सोन्याची तस्करी, आयडिया पाहून अधिकारी झाले हैराण

By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2023 10:47 AM

हैद्राबाद एयरपोर्टवर कस्टम अधिकाऱ्यांनी सोन्याची तस्करी करणारी व्यक्ती पकडली आहे.

जगभरात स्मगलिंगच्या वेगवेगळ्या केसेस रोज समोर येत असतात. कुठे ड्रग्स स्मगल केलं जातं तर कुठे सोनं. आतापर्यंत स्मगलिंगच्या अनेक केसेसबाबत तुम्ही ऐकलं असेल. कधी एखाद्या व्यक्तीने शरीरात सोनं लपवलं, तर कुणी विगमध्ये...पण काही केसेस अशा असतात ज्या हैराण करतात. हैद्राबाद एयरपोर्टवर कस्टम अधिकाऱ्यांनी सोन्याची तस्करी करणारी व्यक्ती पकडली आहे. त्याच्या स्मगलिंगच्या पद्धतीने सगळ्यांना हैराण केलं.

मीडिया रिपोर्टनुसार, हे सोनं दुबईहून भारतात आणण्यात आलं होतं. नियमांनुसार काही प्रमाणात सोनं दुबईहून भारतात आणता येतं. दुबईमध्ये भारताच्या तुलनेत सोन्याचे भाव कमी आहेत. त्यामुळे अनेक लोक प्रयत्न करतात की, जास्तीत जास्त सोनं दुबईहून आणता यावं. पण टॅक्स वाचवण्याच्या नादात ते याचं स्मगलिंग करू लागतात. गोल्ड स्मगलिंगच्या केसमध्ये पोलिसांनी हैद्राबाद एअरपोर्टवर 26 लाख 64 हजार रूपये किंमतीचं सोनं पकडलं आहे.

फारच अनोखी होती पद्धत

आतापर्यंत कस्टम अधिकाऱ्यांनी स्मगलिंगच्या वेगवेगळ्या पद्धतीने पाहिल्या आहेत. कधी कुणी कपड्यांमध्ये सोनं लपवतात तर कुणी पार्श्वभागात लपवतात. पण यावेळची पद्धत फारच यूनिक होती. सोन्याची तस्करी करण्यासाठी यावेळी सोन्याचं पावडर करण्यात आलं. त्यानंतर ते डिटर्जेंट पावडरच्या पॅकेटमध्ये मिक्स केलं. पण त्यानंतरही हे सोनं पकडण्यात आलं.

पाण्यात टाकताच झालं वेगळं

जेव्हा वस्तू चेक करण्यात आल्या तेव्हा त्यात डिटर्जेंटचं पॅकेट सापडलं. हे डिटर्जेंट एका प्लेटमध्ये टाकण्यात आलं आणि त्यात पाणी टाकलं. तेव्हा सत्य समोर आलं. डिटर्जेंट पाण्यात विरघळलं आणि सोनं तसंच खाली राहिलं. ही आयडिया बघून कस्टम अधिकारीही हैराण झाले. याचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आणि लगेच व्हायरल झाला. 

टॅग्स :GoldसोनंSmugglingतस्करी