शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

रातोरात बनला करोडपती! बँक खात्यात अचानक आले 25 कोटी रुपये, पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2022 17:43 IST

50  हजार रुपये खर्च करण्याचे नियोजन सुरू केले. पण त्याचा आनंद फार काळ टिकू शकला नाही. वास्तव समजल्यानंतर तो निराश झाला.

एका व्यक्तीच्या बँक खात्यात अचानक कोट्यवधी रुपये आल्याने तो आश्चर्यचकित झाला. बँक खात्यात एवढी मोठी रक्कम पाहून व्यक्तीच्या आनंदाला पारावार उरला नाही. 50  हजार रुपये खर्च करण्याचे नियोजन सुरू केले. पण त्याचा आनंद फार काळ टिकू शकला नाही. वास्तव समजल्यानंतर तो निराश झाला.

'द सन'च्या वृत्तानुसार, हा व्यक्ती ब्रिटनचा रहिवासी असून त्याचे नाव मायकल कार्पेंटर (Michael Carpenter) आहे.  मायकेल एका रात्रीत करोडपती झाला, पण त्याचा आनंद फार काळ टिकला नाही. दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी मायकलने स्टॉक्स फर्म (Stocks Firm) Hargreaves Lansdownमध्ये 1 कोटी रुपयांपर्यंत गुंतवणूक केली होती. अलीकडेच, एके दिवशी सकाळी उठून त्याने पाहिले की या पैशाने तो करोडपती झाला आहे. त्याच्या स्टॉकने त्याला 2,200 टक्के परतावा दिला आणि त्याची रक्कम एका रात्रीत 25 कोटींहून अधिक झाली, हे पाहून मायकेल आश्चर्यचकित झाला.

मायकेलच्या म्हणण्यानुसार, सुरुवातीला त्याचा आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. मात्र अनेकवेळा खाते पाहिल्यानंतर खरोखरच  25  कोटी रुपये आल्याची खात्री पटल्यावर तो खूप खुश झाला. मात्र, काही वेळातच त्याच्या लक्षात आले आणि विचार केला की, कुठलाही स्टॉक एका रात्रीत इतका कसा वाढू शकतो? अशा परिस्थितीत मायकलने माहितीसाठी Hargreaves Lansdown फर्मला फोन केला. फर्मने तपासले तेव्हा कळले की त्रुटीमुळे ती रक्कम मायकलच्या खात्यात दिसत आहे. 

याबाबत कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले की, या स्टॉकशी संबंधित रक्कम ग्राहकांच्या खात्यात चुकीची दर्शवत होती, ती दुरुस्त करण्यात आली आहे. हे समजल्यानंतर मायकेल निराश झाला. मात्र, सुरुवातीला त्याला काहीतरी गडबड आहे असे वाटल्याने त्याने फर्मला फोन करून खात्री केली. 

टॅग्स :bankबँकJara hatkeजरा हटके