शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

डीजेवाल्याच्या प्रेमात पडली, लग्नही केलं आणि आता कुटुंबिय देताहेत जीवे मारण्याची धमकी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2023 17:35 IST

23 वर्षीय प्रियंका मेघवाल गावात डीजे घेऊन आलेल्या डीजेवाले बाबूच्या प्रेमात पडली. दोघांनी नंबर शेअर केले आणि त्यांचं बोलणं सुरू झालं. दोघांनाही लग्न करायचं होतं.

कोण, कधी आणि कुठे कुणाच्या प्रेमात पडेल हे काहीच सांगत नाही आणि जेव्हा कुणी प्रेमात पडतात तेव्हा पुढे काय होईल याचा विचार करत नाहीत. त्यांना एक व्हायचं असतं. असंच काहीसं राजस्थानच्या झुंझुनूं जिल्ह्यात झालं. 23 वर्षीय प्रियंका मेघवाल गावात डीजे घेऊन आलेल्या डीजेवाले बाबूच्या प्रेमात पडली. दोघांनी नंबर शेअर केले आणि त्यांचं बोलणं सुरू झालं. दोघांनाही लग्न करायचं होतं. पण कुटुंबिय यासाठी तयार नव्हते. तरूणी तरूणासोबत पळून गेली आणि त्यांनी लग्नही केलं. पण आता कुटुंबिय त्यांना जीवे मारण्याची धमकी देत आहेत. 

ही घटना चुरूपासून 15 किमी अंतरावरील झुंझुनूं परिसरातील आहे. कुटुंबियांच्या धमक्यांमुळे या कपलने आता पोलिसांकडे सुरक्षेची मागणी केली आहे. प्रियंका मेघवालने सांगितलं की, तीन वर्षाआधी तिची भेट धर्मेन्द्रसोबत झाली होती. धर्मेन्द्र खासोली गावात राहणारा आहे.

प्रियंका पदवीधर आहे तर धर्मेन्द्र 12वी पास आहे. धर्मेन्द्र तीन वर्षाआधी बिसाऊच्या एका लग्नात डीजे घेऊन आला होता. धर्मेन्द्रला बघताच ती त्याच्या प्रेमात पडली होती. त्यानंतर दोघेही फोनवर बोलत होते. तिला हे माहीत होतं की, धर्मेन्द्र 12वी पास आहे आणि डीजे वाजवतो. प्रियंकाने जेव्हा तिच्या नात्याबाबत कुटुंबियांना सांगितलं तेव्हा त्यांनी नकार दिला.

कुटुंबियांच्या विरोधानंतर 15 जून 2023 ला दोघेही घर सोडून पळून गेले आणि गाझियाबादमध्ये पोहोचले. इथे त्यांनी आर्य समाज मंदिरात लग्न केलं. आंतरजातीय विवाह असल्याने आता दोघांनाही जीवे मारण्याची धमकी दिली जात आहे. धमकी मिळाल्यानंतर दोघांनीही आता पोलिसांकडे मदतीची मागणी केली आहे.

प्रियंका आणि धर्मेंद्रने सांगितलं की, दोघांचंही एकमेकांवर प्रेम आहे. आता दोघांनी लग्नही केलं आहे. पण तरीही प्रियंकाचे कुटुंबिय हे नातं स्वीकारण्यास तयार नाहीत. ते सतत धमक्या देत आहेत. काका-भावांनी जीवे मारण्याची धमकी दिली आहे. अशात आम्हाला सुरक्षा हवी आहे.

टॅग्स :Rajasthanराजस्थानJara hatkeजरा हटकेmarriageलग्न