खरं सांगताय की मस्करी! मोठे ओठ हवेत; म्हणून तरूणीने तब्बल २० वेळा केली सर्जरी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2020 06:27 PM2020-05-17T18:27:10+5:302020-05-17T18:51:42+5:30

वयाच्या बाविसाव्या वर्षी एंड्रिया इवानोवाने आपले ओठ मोठे करण्यासाठी पहिल्यांदा सर्जरी केली.

20 times surgery for worlds largest lip see what happened then up myb | खरं सांगताय की मस्करी! मोठे ओठ हवेत; म्हणून तरूणीने तब्बल २० वेळा केली सर्जरी

खरं सांगताय की मस्करी! मोठे ओठ हवेत; म्हणून तरूणीने तब्बल २० वेळा केली सर्जरी

Next

सुंदर ओठ आणि सुंदर चेहरा सगळ्यांनाच हवाहवासा वाटत असतो. त्यासाठी काहीही करायची तयारी असते सध्याच्या काळात मुलींना नाजुक ओठ नाही तर जाड, हॉट लुक देणारे ओठ जास्त आवडतात. अनेक सेलिब्रिंटीनी सुंदर लूक साठी कॉस्मेटिक्स सर्जरी केलेली अनेक उदाहरणं तुम्हाला माहीत असतील. अशाचप्रकारे एका मुलीला सुंदर ओठ हवे होते. म्हणून तिने तब्बल २० वेळा आपल्या ओठांची सर्जरी केली. तुमचा विश्वास बसणार नाही पण हे खरं आहे. या मुलीचं नाव एंड्रिया आहे.

 या मुलीचा फोटो पाहून तुम्हाला धक्काच बसेल. या तरूणीने ओठांसाठी  १३५ युरो म्हणजे जवळपास ११ हजार रुपये खर्च केले आहेत. वयाच्या बाविसाव्या वर्षी एंड्रिया इवानोवाने आपले ओठ मोठे करण्यासाठी  पहिल्यांदा सर्जरी केली. सोशल मीडियावर या मुलीच्या मोठ्या ओठांच्या फोटोनं धुमाकूळ घातला आहे. कारण हे ओठ पाहताना खूप विचित्र दिसून येत आहेत. 

मागील आठवड्यात  एंड्रियाने आपला फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा फोटो सोशल मीडियावर आता व्हायरल होत आहे.एंड्रियाला तीचे ओठ खूप आवडतात. आपले ओठ जगातील सगळ्यात मोठे ओठ असल्याचं तीचं म्हणणं आहे.  आत्तापर्यंत अनेकांनी अशी सर्जरी केली आहे. इराणची प्रसिद्ध इन्स्टाग्राम स्टार सहर तबर  हिने  हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री अँजेलिना जॉलीसारखं दिसण्यासाठी आपल्या चेहऱ्याची तब्बल ५० वेळा सर्जरी करून घेतली होती. त्यानंतर या महिलेचा चेहरा पूर्णपणे बदलला. 

(५ हजार किलोची सोन्याची मुर्ती माहीत आहे का? जाणून घ्या रहस्यमय मुर्तीबाबत)

(आता सूर्यही झाला 'लॉकडाऊन'; भीषण थंडी, भूकंपाची वैज्ञानिकांनी व्यक्त केली शक्यता)

Web Title: 20 times surgery for worlds largest lip see what happened then up myb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.