१४ वर्षांच्या बॉम्बरने ५० जणांना मारले

By Admin | Updated: July 7, 2015 23:11 IST2015-07-07T23:03:17+5:302015-07-07T23:11:46+5:30

इसिसने सिरियातील रास अल पेन या उत्तर सीमेवरील शहरात आत्मघातकी बॉम्बचा स्फोट घडवून आणला असून, हा बॉम्बर फक्त १४ वर्षांचा होता, हे विशेष!

The 14-year-old bomber killed 50 people | १४ वर्षांच्या बॉम्बरने ५० जणांना मारले

१४ वर्षांच्या बॉम्बरने ५० जणांना मारले

बैरूत : इसिसने सिरियातील रास अल पेन या उत्तर सीमेवरील शहरात आत्मघातकी बॉम्बचा स्फोट घडवून आणला असून, हा बॉम्बर फक्त १४ वर्षांचा होता, हे विशेष! जगातील सर्वांत लहान बॉम्बर असा त्याचा उल्लेख करण्यात आला.
हा बॉम्बर हसाका शहराजवळ ट्रक घेऊन आला व तेथील चेक नाक्यावर त्याने स्वत:चा स्फोट घडविला. या स्फोटात इसिसच्या विरोधात लढणारे ५० कुर्दीश सैनिक ठार झाले. या मुलाचे नाव उमर हदीद अल मोहम्मदी असे आहे.
हिरव्या रंगाचा लष्करी पोशाख घातलेला हा कोवळा तरुण हातात रायफल घेऊन उभा राहिलेला या छायाचित्रात दिसत आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: The 14-year-old bomber killed 50 people