शहरं
Join us  
Trending Stories
1
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
2
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
3
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
4
Top Marathi News LIVE Updates: 'मविआ'कडून अंबादास दानवे विधान परिषदेचे उमेदवार- आदित्य ठाकरे
5
लग्नासाठी तयार व्हायला नवरी ब्युटी पार्लरमध्ये गेली अन् घडलं आक्रित; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
6
IPL 2026: वैभव सूर्यवंशी असेच षटकार मारत राहिला तर मोडणार ख्रिस गेलचा १४ वर्ष जुना विक्रम
7
पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?
8
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
9
सरकारी नोकरीत रिजेक्टचा ठपका; मग एका रात्रीत 'करोडपती' होऊन विदर्भकर IPL स्टार कसा बनला?
10
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
11
भ्रष्टाचाराची तक्रार केली, ग्राम प्रमुखाला जेव्हा कळलं तेव्हा झाला 'मोठ्ठा कांड'! काय घडलं?
12
Travel Tips: फिरण्याची आवड आहे पण खिशाला परवडत नाही? जगभ्रमंतीची 'अशी' फिटवा हौस 
13
"दिग्दर्शक रात्री खोलीत शिरला, केली घाणेरडी मागणी"; अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव
14
IMDb Play Trick: सावधान! IMDb वर मोफत चित्रपट पाहण्याचा 'हा' जुगाड पडू शकतो महागात!
15
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
16
विराटच्या खांद्याला खांदा लावून वर्ल्डकप जिंकला, आता IPL 2026 मध्ये करतोय पंचगिरी, कोण आहे 'हा' खेळाडू?
17
३३ व्या वाढदिवसाचा भयंकर स्टंट! गोरेगावमध्ये पेट्रोल ओतून रस्ता पेटवला; रील स्टारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
18
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
19
"संजय राऊत, अशी मुक्ताफळं उधळताना तुम्हाला लाज वाटली नाही का..?"; भाजप नेत्याचा खरमरीत सवाल
20
नवरदेव झिंगत डुलत आला, कारमधून उतरताना लटपटला, संतप्त वधूने तिथेच लग्न मोडले
Daily Top 2Weekly Top 5

कोर्टात झाली 13 पोपटांची हजेरी अन् मालकाला घडली तुरुंगवारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2019 19:25 IST

कोर्टात आलेल्या पोपटांनी वेधलं अनेकांचं लक्ष

दिल्ली: पटियाला हाऊस कोर्टात आज चक्क पोपटांना हजर करण्यात आल्यानं अनेक जण चक्रावून गेले. न्यायालयाचं कामकाज सुरू असताना १३ पोपटांना आणण्यात आलं. त्यामुळे आाता पोपटांना शिक्षा होणार की काय, असा प्रश्न अनेकांच्या मनात आला. त्यामुळे न्यायालयात आणण्यात आलेले पोपट चांगलेच लक्षवेधी ठरले. मंगळवारी (काल) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलानं दिल्लीतल्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका परदेशी व्यक्तीला अटक केली. त्याच्याकडे सुरक्षा दलाच्या जवानांना १३ पोपट सापडले. आरोपी या पोपटांना घेऊन उझबेकिस्तानमधील ताश्कंदला जात होता. त्यावेळी सुरक्षा दलाच्या जवानांना त्याचा संशय आला. यानंतर त्याला पक्ष्यांच्या तस्करी प्रकरणात ताब्यात घेण्यात आलं. आज आरोपीसह १३ पोपटांना पटियाला हाऊस कोर्टात आणण्यात आलं. न्यायालयानं आरोपीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी ठोठावली. आरोपी ज्युटच्या पाकिटांमधून अवैधपणे पोपटांना ताश्कंदला नेत होता. न्यायालयात सीमाशुल्क विभागाच्या वतीनं पी. सी. अगरवाल यांनी बाजू मांडली. वन्यजीव कायद्यानुसार प्राणी पक्ष्यांची खरेदी करण्यास बंदी असल्याचं त्यांनी सांगितलं.