चंदीगड : कोणाचा मृत्यू झाल्यास नाच-गाणे केले जाते का? असे दृश्य क्वचितच कोणी बघितले असेल. परंतु, पंजाबमधील फाजिलकाच्या शाह हिठाड गावात १२७ वर्षांचे टहल सिंह यांच्या मृत्यूनंतर अंत्ययात्रेत लोक नाचत होते.टहल सिंह यांचा शनिवारी मृत्यू झाल्यावर मोठा गाजावाजा करीत त्यांची अंत्ययात्रा काढली गेली. त्यांचे कुटुंबीय आणि ग्रामस्थ ढोल-नगारे वाजवत व नाचत-गात त्यामध्ये दिसले. अंत्ययात्रेत सहभागी असलेल्या कोणाच्याही चेहऱ्यावर उदास भाव नव्हता. त्यांच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार टहल सिंह यांचा जन्म १८९४ मध्ये झाला. त्यांच्या भावांनीही वयाची १०० वर्षे पूर्ण केली होती. त्यांचा एक भाऊ आज १०९ वर्षांचा आहे.
१२७ व्या वर्षी निधन, वाद्यांसह निघाली अंत्ययात्रा; कुटुंबीय अन् ग्रामस्थांचा नाचत-गात सहभाग
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2021 06:08 IST