१२६३८ हिऱ्यांची अंगठी गिनीज बुकमध्ये  

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2020 04:15 AM2020-12-06T04:15:50+5:302020-12-06T07:08:49+5:30

एका २५ वर्षीय ज्वेलरने हिऱ्याची अशी अंगठी बनविली आहे ज्यामुळे त्याचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदविले गेले आहे. या तरुणाने फुलाच्या आकाराच्या अंगठीत १२,६३८ छोटे हिरे जोडले आहेत. 

12638 diamond ring in Guinness Book | १२६३८ हिऱ्यांची अंगठी गिनीज बुकमध्ये  

१२६३८ हिऱ्यांची अंगठी गिनीज बुकमध्ये  

Next

नवी दिल्ली : एका २५ वर्षीय ज्वेलरने हिऱ्याची अशी अंगठी बनविली आहे ज्यामुळे त्याचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदविले गेले आहे. या तरुणाने फुलाच्या आकाराच्या अंगठीत १२,६३८ छोटे हिरे जोडले आहेत. 
या अंगठीला मेरीगोल्ड असे नाव देण्यात आले आहे. याचे वजन जवळपास १६५ ग्राम आहे. यापूर्वी ज्या अंगठीने सर्वाधिक हिरे असण्याचा रेकॉर्ड केला होता तीही भारतीयाने तयार केली होती. त्या अंगठीत ७८०१ हिरे लावण्यात आले होते. 
ही नवी अंगठी बनविणाऱ्या हर्षित बन्सलचे म्हणणे  आहे की, हा आपला ड्रिम प्रोजेक्ट होता. ही अंगठी विक्री करण्याचा विचार नाही.   

Web Title: 12638 diamond ring in Guinness Book

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.