शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑस्ट्रेलियात दहशतवादी हल्ला, १२ पर्यटक ठार, २९ जखमी; सिडनीतील बाँडी बीचवर बेछूट गोळीबार 
2
IND vs SA 3rd T20I : टीम इंडियानं मॅच जिंकत दक्षिण आफ्रिकेला टाकले मागे; पण सूर्या-गिल पुन्हा फेल!
3
अपहरणाचा कट नगर पोलिसांनी उधळला! पुण्याच्या दिशेने जाताना नागापूर पुलावर थरार, दोघांना अटक
4
"मोदी, शाह, राजनाथ, नड्डा...!" भाजपचे कार्यकारी अध्यक्ष होताच काय म्हणाले नितीन नवीन?
5
‘लोकमत महागेम्स’मुळे पुन्हा मैदानावर दिसली क्रीडासंस्कृती: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
6
'मिसेस मुख्यमंत्री' GOAT मेस्सीला भेटल्या, खास PHOTO पोस्ट करून अमृता फडणवीसांनी लिहिले...
7
पंतप्रधान मोदी, रशियाचे पुतिन यांच्या खास मैफलीत झंकारली नागपूरकर लावण्य अंबादे यांची सतार
8
मीरा भाईंदर महापालिका, परिवहन ठेकेदाराच्या वादात बससेवा डबघाईला; सामान्य नागरिकांना मनस्ताप
9
महिनाभर आधी झालेलं प्रेयसीचं लग्न, पहिल्या प्रियकराने नवऱ्याला भेटायला बोलवलं अन् संपवलं...
10
VIDEO: आधी गणपती बाप्पाचा जयजयकार, नंतर CM देवेंद्र फडणवीसांनी मेस्सीला केलं एक 'प्रॉमिस'
11
U19 Asia Cup, IND vs PAK : टीम इंडियाने उडवला पाकचा धुव्वा; हायव्होल्टेज मॅचमध्ये काय घडलं?
12
"राहुल गांधींचे सैनिक बणून मोदींविरोधात...!" रामलीला मैदानावरून रेवंत रेड्डीची गर्जना
13
IND vs SA : पांड्याच्या 'सेंच्युरी'सह चक्रवर्तीची 'फिफ्टी'! शेवटच्या षटकात बर्थडे बॉयचा जलवा अन्....
14
VIDEO : क्रिकेटचा 'देव' सचिन आणि फुटबॉलचा 'जादूगार' मेस्सीची ग्रेट भेट; खास गिफ्ट अन् बरंच काही
15
"दिल्ली को दुल्हन बनाएंगे..., आमच्या समोर S-400, राफेल...!"; लश्करच्या दहशतवाद्यानं ओकली गरळ 
16
"हनुकाची पहिली मेणबत्ती...!", ऑस्ट्रेलियात ज्यूंच्या उत्सवादरम्यान झालेल्या गोळीबारावर इस्रायलची पहिली प्रतिक्रिया 
17
सत्याच्या बळावर मोदी-शाह अन् RSS ची सत्ता उलथून लावू; राहुल गांधीचे टीकास्त्र
18
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
19
सिडनी गोळीबारावर PM मोदी म्हणाले, "हा मानवतेवर हल्ला, भारत ऑस्ट्रेलियासोबत खंबीर उभा..."
20
रेस्टॉरंटमध्ये लपला..; ऑस्ट्रेलियातील गोळीबारात इंग्लंडचा माजी कर्णधार थोडक्यात बचावला
Daily Top 2Weekly Top 5

107 घरांना आगी लागल्या, कारण एकच पण अत्यंत भयानक! वाचाल तर झोप उडेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2022 19:47 IST

मांजरींनी खेळाखेळात किचनमधील गॅसजवळ कागद किंवा कापड ठेवल्यामुळेही घरात आग लागल्याच्या घटना घडल्या. तर काही प्रकरणांमध्ये विजेची तार ओढल्याने स्पार्किंग होऊन आग लागल्याचंही समोर आलं आहे.

दक्षिण कोरियामध्ये गेल्या वर्षांत रहस्यमी पद्धतीने घराला आग (House Fire Incident) लागल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. पोलिसांनी या प्रकरणांचा सखोल तपास केला असता आगीचं नेमकं कारण समोर आलं आहे. हे कारण जाणून पोलीसही हैराण झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या आगीमागे इतर कोणीही नाही तर मांजर जबाबदार होत्या.

WION च्या रिपोर्टनुसार, ज्या घरांमध्ये आग लागली, तिथे मांजर पाळलेली होती किंवा त्या घरांमध्ये मांजरी येत-जात असत. तपासात असं समोर आलं की मांजरांनी घरात जळणाऱ्या मेणबत्ती खाली पाडल्या, यामुळे आसपासच्या कपड्यांना आणि कागदांना आग लागली. इतकंच नाही तर मांजरींनी खेळाखेळात किचनमधील गॅसजवळ कागद किंवा कापड ठेवल्यामुळेही घरात आग लागल्याच्या घटना घडल्या. तर काही प्रकरणांमध्ये विजेची तार ओढल्याने स्पार्किंग होऊन आग लागल्याचंही समोर आलं आहे. (Fire Caused by Cats)

सीएनएनच्या एका लेखानुसार, अग्निशामक दलाने गुरुवारी घोषणा केली की जानेवारी २०१९ आणि नोव्हेंबर २०२१ या काळात देशात रहस्यमयी पद्धतीने आग लागल्याच्या १०७ घटना घडल्या. या सर्व घटना मांजरीमुळे घडल्या होत्या. डिपार्टमेंटनं सांगितलं की विजेपासून किचनमधील गॅसपर्य़ंत कोणतंही उपकरण अधिक वेळ चालू राहिल्यास गरम होऊन यात आगीचा भडका होऊ शकतो.

रिपोर्टनुसार १०७ घटनांमधील अर्ध्याहून अधिक घटना तेव्हा घडल्या, जेव्हा घराचे मालक घरापासून दूर होते. मांजरींमुळे घडलेल्या या घटनांमध्ये ४ लोक आगीत जखमी झाले. विभागाचे अधिकारी Chung Gyo-chul म्हणाले की देशात मांजरामुळे आग लागल्याच्या घटना सातत्याने वाढत आहेत. त्यामुळे घरातून बाहेर पडताना सावधान राहा आणि मांजरीला एकटीला घरात सोडू नका, असा सल्ला त्यांनी दिला आहे. सोबतच दक्षिण कोरिया सरकारने लोकांना सल्ला दिला आहे, की मांजर पाळणाऱ्या लोकांनी घरातून बाहेर पडताना गॅस आणि स्टोवर काहीतरी कव्हर लावावं किंवा ते व्यवस्थितरित्या बंद करून जावं.

टॅग्स :Jara hatkeजरा हटके