जि.प. सभापती  कोरोना मुक्त होऊन घरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 16:12 IST2020-06-10T16:11:13+5:302020-06-10T16:12:46+5:30

कोविड पॉझिटिव्ह आलेल्या जिल्हा परिषद सभापती व त्यांच्या मुलगा ‘कोरोना मुक्त’ झाल्याने कोविड रुग्णालयातून सुटी करण्यात आली आहे.

Z.P. Speaker Corona is free and at home | जि.प. सभापती  कोरोना मुक्त होऊन घरी

जि.प. सभापती  कोरोना मुक्त होऊन घरी

मुक्ताईनगर : कोविड पॉझिटिव्ह आलेल्या जिल्हा परिषद सभापती व त्यांच्या मुलगा ‘कोरोना मुक्त’ झाल्याने बुधवारी दुपारी दोघा पिता पुत्रांची जळगाव येथील कोविड रुग्णालयातून सुटी करण्यात आली आहे.
गेल्या १ जून रोजी या जि.प. सभापती व त्यांच्या मुलाला कोरोना लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. विशेष म्हणजे या सभापतींनी स्वत:हून मुक्ताईनगर कोविड सेंटरला जाऊन स्वत: व त्यांच्या मुलाचे कोविड तपासणीसाठी नमुने दिले होते.
१० दिवसांच्या उपचार अंती दोघे पिता पुत्र कोरोनामुक्त झाल्याने त्यांची बुधवारी सुटी करण्यात आली आहे.
कोरोनावर उपचार होऊन कोरोनामुक्त झाल्यानंतर घरी परतणारे ते तालुक्यातील पहिले कोरोना मुक्त रुग्ण होय.

Web Title: Z.P. Speaker Corona is free and at home