शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
2
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
3
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
4
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच
5
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
6
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, निफ्टी ७० अंकांच्या तेजीसह उघडला; मेटल-रियल्टी शेअर्समध्ये खरेदी
7
ऑफर्स, ऑनलाईन चॅट्स, फसवणुकीचं जाळं...; iPhone चं आमिष दाखवून लाखोंची फसवणूक
8
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले
9
आधार कार्डापासून ते बॅंक अकाऊंट पर्यंत, १ नोव्हेंबरपासून बदलणार ‘हे’ ५ नियम; तुमच्या खिशावर थेट होणार परिणाम
10
आजचे राशीभविष्य, २७ ऑक्टोबर २०२५: धनलाभ योग, ठरवलेली कामे होतील; यशाचा-प्रसन्न दिवस
11
आंतरराष्ट्रीय जुजित्सू खेळाडू रोहिणी कलम यांनी आयुष्य संपविले; एक फोन आला आणि ती खोलीत गेली...
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
13
८ मिनिटांत ८ अब्ज रुपयांचे दागिने चोरणारे चोर सापडले; पॅरिसच्या म्युझियममध्ये टाकलेला दरोडा
14
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
15
टॅरिफची धमकी मिळाल्याने थायलंड-कंबोडियात युद्धबंदी; ट्रम्प यांच्या आणखी एका मध्यस्थीला मिळाले यश
16
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू
17
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा, हातातोंडाशी आलेल्या पिकांवर मारा; जोर वाढण्याची शक्यता, चार-पाच दिवस सावट
18
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
19
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
20
गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकासास पूर्ण मुभा; कोर्टाच्या निर्णयामुळे संभ्रम दूर, जुने परिपत्रक मागे घेण्याचे आदेश

दज्रेदार शिक्षणासाठी सरसावले माजी विद्यार्थी; कल्याणे खुर्द जि.प. शाळेचे पालटतेय चित्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 12:58 IST

टी.व्ही. संच भेट

ठळक मुद्देलवकरच रंगरंगोटी करणार24 हजार रुपये केले गोळा

विकास पाटील / ऑनलाइन लोकमतजळगाव, दि. 14 -  धरणगाव तालुक्यातील कल्याणे खुर्द येथील जिल्हा परिषद शाळेच्या माजी विद्याथ्र्यानी गावातील विद्याथ्र्याना गावातच दज्रेदार प्राथमिक शिक्षण मिळावे यासाठी विडा उचलला आहे. त्यासाठी 25 माजी विद्यार्थी एकवटले असून ग्रामस्थांच्या सहकार्याने जि.प. शाळेचे चित्र बदलू लागले आहे.कल्याणे खुर्द हे सुमारे 2 हजार लोकवस्तीचे गाव. येथे पहिली ते चौथीर्पयत जिल्हा परिषदेची शाळा आहे. या शाळेने गावातील अनेक विद्याथ्र्याना इंजिनिअर, शिक्षक, पोलीस बनविले. मुंबई, पुणे यासह राज्यात अनेक ठिकाणी महत्त्वाच्या पदावर हे माजी विद्यार्थी कार्यरत आहेत. ज्या शाळेने आपल्याला दज्रेदार शिक्षण दिले. मोठय़ा पदार्पयत पोहचविले. त्या शाळेची दैना पाहून माजी विद्यार्थी नाराज झाले. सोशल मीडियावर चर्चा झाली अन् मदतीचे हात सरसावलेदज्रेदार शिक्षण मिळत नसल्याने गावातील विद्यार्थी एरंडोल, धरणगाव, पाळधी येथे शिक्षणासाठी ये-जा करू लागले. त्यामुळे जि.प. शाळेची पटसंख्या घसरली. ही बाब माजी विद्याथ्र्यानी सोशल मीडियावर बनविलेल्या ग्रुपवरून सर्व सदस्यांना समजली. अनेकांनी चिंता व्यक्त करीत आपण या शाळेसाठी काही तरी केले पाहिजे. शाळेला गतवैभव आपण मिळवून दिले पाहिजे, असे मत व्यक्त केले.मुंबई येथे सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या अमोल राजपूत व शिक्षक विजय पाटील यांनी त्यासाठी पुढाकार घेतला. शाळेला डिजिटल करण्याचा एकमुखी निर्धार या 25 माजी विद्याथ्र्यानी सोशल मीडियावर केला. शाळेच्या मुख्याध्यापिका सपकाळे, सरपंच अनिता संदीप पाटील व ग्रामस्थांना या माजी विद्याथ्र्यानी गावात येऊन त्यांनी केलेल्या निर्धाराबाबत माहिती दिली. चांगल्या उपक्रमाला कुणीही नकार दिला नाही. शिक्षकांनाही विश्वासात घेतले. त्यांनीही शाळेचा दर्जा उंचावण्यासाठी प्रय} करण्याचा निश्चय केला.24 हजार रुपये केले गोळामाजी विद्याथ्र्यानी शाळेला सर्वप्रथम संगणक देण्याचे ठरविले. त्यासाठी आठवडाभरात 24 हजार रुपये गोळा झाले. मुख्याध्यापिकेशी चर्चा केली. संगणकाऐवजी टी.व्ही. मिळाल्यास विद्याथ्र्याना त्यावर मोठे चित्र पाहता येईल व ते फायदेशीर ठरेल अशी सूचना केली. त्यानुसार माजी विद्याथ्र्यानी 24 इंची टी.व्ही. शाळेला भेट दिला. एका माजी विद्याथ्र्याने पदराचे 9 हजार रुपये खर्च करून शाळेला साऊड सिस्टिम संच भेट दिला. विद्याथ्र्याना टॅब देण्याचा प्रय}पुढील टप्प्यात आता शाळेची रंगरंगोटी करण्याचा निश्चय या भूमिपुत्रांनी केला आहे. त्यानंतर शाळेतील प्रत्येक विद्याथ्र्याला टॅब देण्याचे त्यांचे नियोजन आहे. हा टॅब शाळेत येणा:या प्रत्येकाला दिला जाईल. शाळेत असेर्पयत ते त्याचा वापर करू शकतील, अशी योजना आहे.

ज्या शाळेत आम्ही शिक्षण घेतले. मोठे झालो. त्या शाळेची दैना पाहून नाराज झालो. माजी विद्याथ्र्यापुढे शाळेचे चित्र बदलण्यासाठी प्रस्ताव ठेवला. सर्वानी मदतीचा हात दिला. हळूहळू शाळेचे चित्र बदलू लागले आहे. हे पाहून खूप आनंद होत आहे.-अमोल राजपूत, सॉफ्टवेअर इंजिनिअर, मुंबई (माजी विद्यार्थी, कल्याणे खुर्दर्) 

टॅग्स :educationशैक्षणिकJalgaonजळगाव