रामेश्वर खुर्द येथे जि.प. शाळेत संरक्षण भिंतीचे भूमिपूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2020 22:59 IST2020-10-12T22:56:58+5:302020-10-12T22:59:49+5:30
रामेश्वर खुर्द येथे जि.प.मराठी शाळेत संरक्षण भिंतीच्या कामाचे भूमिपूजन आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

रामेश्वर खुर्द येथे जि.प. शाळेत संरक्षण भिंतीचे भूमिपूजन
अमळनेर : तालुक्यातील रामेश्वर खुर्द येथे जि.प.मराठी शाळेत संरक्षण भिंतीच्या कामाचे भूमिपूजन आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याचवेळी अमळनेर येथील श्रीमती भानुबेन शहा गोशाळेतर्फे उपलब्ध झालेल्या शालेय गणवेशचे वाटपही करण्यात आले.
माजी आमदार साहेबराव पाटील प्रमुख अतिथी होते. भानुबेन शहा गोशाळेतर्फे चेतन शहा, प्रा.अशोक पवार, संदीप घोरपडे, बन्सीलाल भागवत आदींनी शालेय गणवेश उपलब्ध करून दिल्याने मान्यवरांच्या हस्ते ते वाटप करण्यात आले.
यावेळी आमदारांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी सरपंच गंगाराम पाटील, सात्रीचे सरपंच महेंद्र बोरसे, विक्रांत पाटील, रामकृष्ण पाटील, पुना वंजारी, सुरेश वंजारी, केंद्रप्रमुख गोकुळ पाटील, शरद सोनवणे, मनोहर पाटील, योगेश पाटील, वैशाली पाटील उपस्थित होते.स् ाूत्रसंचालन योगेश पाटील यांनी केले.