शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
4
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
5
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
6
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
7
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
8
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
9
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
10
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
11
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
12
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
13
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
14
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
15
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
16
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
17
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
18
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
19
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
20
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले

जि.प. शाळांमध्ये ५० टक्केही उपस्थिती नाही, ग्रामीण भागातील प्राथमिक शाळांना दांडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2020 14:03 IST

शासनाने नुकतेच परिपत्रक काढून शाळेत दररोज शिक्षकांची ५० टक्के उपस्थिती असणे बंधनकारक केले आहे. मात्र तरीही शाळेत शिक्षकांची ५० टक्के उपस्थिती नसल्याची स्थिती उघडकीस आली आहे.

ठळक मुद्देकेवळ नामधारी 50 टक्के उपस्थितीकोरोनानंतर शिक्षणाचा बोजवारा
अमळनेर : शासनाने नुकतेच परिपत्रक काढून शाळेत दररोज शिक्षकांची ५० टक्के उपस्थिती असणे बंधनकारक केले आहे. मात्र तरीही शाळेत शिक्षकांची ५० टक्के उपस्थिती नसल्याची स्थिती उघडकीस आले आहे. केवळ ५० टक्के उपस्थितीच काय पण १०० टक्के अनुपस्थिती शाळांमध्ये प्रत्यक्ष भेट दिली असता दिसली.यात काही ठिकाणी होतकरू शिक्षकांची मात्र ५० टक्के उपस्थिती दिसली. नोव्हेंबर महिन्यात नुकतेच शासनाने एक परिपत्रक निर्गमित करून शाळेत दररोज शिक्षकांची ५० टक्के उपस्थिती असणे बंधनकारक केले आहे. गेल्या सहा महिन्यांपासून अनेक शिक्षकांच्या सेवा आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कोरोना साथरोग उपाययोजना कार्यक्रमाकरिता संलग्न करण्यात आल्या होत्या. त्यात शिधावाटप केंद्र, विलगीकरण केंद्र, निरंतर सर्वेक्षणासाठी शिक्षकांच्या सेवा संलग्नित केल्या होत्या. त्या पूर्ण झाल्यानंतर चालू शैक्षणिक सत्रात शाळा अजूनपर्यंत सुरू झालेल्या नाहीत. शासन परिपत्रक निघून एक महिना उलटूनही अद्याप काही शाळांत दांडी मारलेली दिसते.या ठिकाणी दिल्या भेटीतालुक्यातील गलवाडे, झाडी, लोण, मुडी, तरवाडे, शिरसाळे, ढेकूसीम या गावांना भेटी दिल्या. त्यात ढेकूसीम येथे शिक्षिका उपस्थित होत्या, तर शिरसाळे येथेही शिक्षिका उपस्थित होत्या. तरवाडे येथे शाळा बंद होती. गलवाडे येथे शाळा बंद होती. झाडी येथे शिक्षक उपस्थित होते. लोण येथेही शिक्षक उपस्थित होते, तर मुडी येथे शाळेत कुत्रे बसलेले होते. केंद्रप्रमुखांना तंबीज्या केंद्रातील शिक्षक गैरहजर असतील त्या केंद्रप्रमुखांनादेखील तंबी दिली जाणार असल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी आर.डी.महाजन यांनी दिली. तसेच ज्या शाळा बंद असतील तेथील मुख्याध्यापक व शिक्षकांना नोटीस पाठवून चौकशी करून अहवाल मागवला जाईल.-आर.डी.महाजन, गटशिक्षणाधिकारी, अमळनेर
टॅग्स :Educationशिक्षणAmalnerअमळनेर