दसनूरच्या वैशाली पाटील व ऐनपूरचे कमलेश महाजन यांना जि.प आदर्श शेतकरी पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:13 IST2021-07-02T04:13:18+5:302021-07-02T04:13:18+5:30

जि.प.स्तरावरील जळगाव येथे होणारा हा दोन वर्षाचा पुरस्कार वितरण सोहळा कोरोनाच्या निर्बंधामुळे रावेर पं स कार्यालयाच्या सभागृहात संपन्न झाला. ...

ZP Adarsh Shetkari Award to Vaishali Patil of Dasnur and Kamlesh Mahajan of Ainpur | दसनूरच्या वैशाली पाटील व ऐनपूरचे कमलेश महाजन यांना जि.प आदर्श शेतकरी पुरस्कार

दसनूरच्या वैशाली पाटील व ऐनपूरचे कमलेश महाजन यांना जि.प आदर्श शेतकरी पुरस्कार

जि.प.स्तरावरील जळगाव येथे होणारा हा दोन वर्षाचा पुरस्कार वितरण सोहळा कोरोनाच्या निर्बंधामुळे रावेर पं स कार्यालयाच्या सभागृहात संपन्न झाला.

रावेर पंचायत समिती सभागृहात आयोजित कृषी दिन सोहळ्यात वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस सभापती कविता कोळी, गटविकास अधिकारी दीपाली कोतवाल, पाल कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ.महेश महाजन, पं.स.सदस्य जुम्मा तडवी, योगिता वानखेडे यांच्याहस्ते पूजन व दीपप्रज्वलन करून अभिवादन करण्यात आले.

दरम्यान, सन २०१९ /२० चा जि.प. आदर्श शेतकरी पुरस्काराचे स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र, शाल - श्रीफळ व १० हजार रु.चा धनादेश दसनूर येथील रणरागिणी तथा उच्चशिक्षित महिला शेतकरी वैशाली प्रभाकर पाटील यांना तर सन २०२० /२१ चा जि. प. आदर्श शेतकरी पुरस्कार ऐनपूर येथील प्रयोगशील शेतकरी कमलेश महाजन यांना सभापती कविता कोळी व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

दरम्यान, प्रास्ताविक तालुका कृषी अधिकारी एम.जी. भामरे यांनी केले. यावेळी कृषी पर्यवेक्षक व्ही.एम.रूले यांनी वसंतराव नाईक यांच्या जीवनचरित्रावर विचार प्रकट केले. कृषी सहायक भालचंद्र ढाले यांनी कृषी संजीवनी योजनेची माहिती विशद केली. सूत्रसंचालन व्ही.पी. पवार यांनी, तर आभार कृषी विकास अधिकारी एल.ए.पाटील यांनी केले.

Web Title: ZP Adarsh Shetkari Award to Vaishali Patil of Dasnur and Kamlesh Mahajan of Ainpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.