आॅनलाईन लोकमतजळगाव,दि.२७ : सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम (सुराक्षनिका) च्या कर्मचाºयांना सन २०१४ ते २०१८ पर्यंत मानधनवाढ व लोयल्टी बोनस देण्यात यावा या मागणीसाठी सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम विभागाच्या कंत्राटी कर्मचा-यांनी जिल्हा परिषदेसमोर २७ पासून आंदोलन सुरु केले आहे. चोपडा तालुक्यातील जि.प.सदस्या प्रा.डॉ.निलम पाटील यांनी उपोषणात सहभाग नोंदविला आहे.जळगाव ग्रामीण मधील सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमातंर्गत काम करणाºया कंत्राटी कर्मचाºयांना जि.प.आरोग्य विभागाने सन २०१४ ते २०१८ या दरम्यान मानधनवाढ व लोयल्टी बोनस दिलेला नाही. या संदर्भात सुराक्षनिका कंत्राटी कर्मचा-यांनी वारंवार मागणी केली. २३ मार्च २०१८ रोजी झालेल्या जिल्हा परिषदेच्या नियोजन समितीच्या सभेत जि.प.सदस्या प्रा.डॉ.निलम पाटील यांनी हा विषय भक्कमपणे मांडला. मात्र त्यानंतरही प्रशासनाकडून ठोस आश्वासन न मिळाले नाही. त्यामुळे प्रा.डॉ.निलम पाटील यांच्या नेतृत्वाखाली कंत्राटी कर्मचाºयांनी २७ मार्च पासून जिल्हापरिषदेसमोर उपोषणला प्रारंभ केला आहे.आपल्या मागणीचे निवेदन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिका-यांना यावेळी देण्यात आले. यावेळी दयानंद पाटील, किशोर सैंदाणे, किशोर अहिरराव, प्रमोद पाटील, ललित राणे, संदीप अहिरराव, दीपक मोरे, प्रदीप झांबरे, अकील पटेल, योगीराज पाटील, सुयोग महाजन, एन.सी.जंगले, एन.व्ही.चौधरी,एस.बी.तायडे, नीलेश माळी, मंगेश खैरनार, भगवान चौधरी, नीलेश भंगाळे, हर्षल पाठक, राहुल वाडिले, नरेंद्र सूर्यवंशी, भानुदास चौधरी, आसिफ तडवी, एन.बी.राणे यांनी सहभाग नोंदविला.
जळगावात कर्मचाऱ्यांच्या मानधनासाठी जिल्हा परिषद सदस्यांचे उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 17:56 IST
क्षयरोग कर्मचा-यांना मानधनवाढ व बोनस देण्याची केली मागणी
जळगावात कर्मचाऱ्यांच्या मानधनासाठी जिल्हा परिषद सदस्यांचे उपोषण
ठळक मुद्देजि.प.सदस्या प्रा.डॉ.निलम पाटील यांनी उपोषणात सहभाग नोंदविलाकर्मचा-यांना सन २०१४ ते २०१८ पर्यंत मानधनवाढ व लोयल्टी बोनस देण्याची मागणीजिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारि अधिका-यांना दिले निवेदन