दुसऱ्या लाटेत प्रथमच शहरात शून्य रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:13 IST2021-07-02T04:13:01+5:302021-07-02T04:13:01+5:30
३०० चाचण्या : आरटीपीसीआरमध्येही रुग्ण नाही लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत गुरुवारी प्रथमच एकही नवा ...

दुसऱ्या लाटेत प्रथमच शहरात शून्य रुग्ण
३०० चाचण्या : आरटीपीसीआरमध्येही रुग्ण नाही
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत गुरुवारी प्रथमच एकही नवा रुग्ण आढळून आलेला नाही. दिवसभरात ३०० चाचण्या झाल्या असून यात एकही रुग्ण समोर आलेला नाही. यात ७० आरटीपीसीआर तर २३० अँटिजन चाचण्यांचा समावेश आहे. यामुळे मोठे हॉटस्पॉट ठरलेल्या जळगाव शहराला हा मोठा दिलासा मानला जात आहे.
जिल्हाभरात गुरुवारी १२ रुग्णांची नोंद करण्यात आली. बुधवारी १५ रुग्ण आढळून आल्यानंतर गुरुवारी ही संख्या अधिक घटली. दरम्यान, चाचण्यांची संख्या स्थिर असताना ही संख्या घटल्याने संसर्गात अचानक घट झाल्याचे चित्र आहे. आरटीपीसीआरच्या १७८३ अहवालांमध्ये ३ बाधित आढळून आले आहेत. तर अँटिजनच्या २६५१ चाचण्यांमध्ये ९ बाधित आढळून आले आहेत.