कर्जदारांच्या तगाद्याने जळगावात तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2018 21:56 IST2018-06-09T21:56:42+5:302018-06-09T21:56:42+5:30
व्यवसायासाठी व्याजाने घेतलेली रक्कम परत केल्यानंतरही जागा बळकावण्याची धमकी दिली जात असल्याने पवन युवराज निकम (वय २९, रा.मुक्ताईनगर, जळगाव) या तरुणाने राहत्या घरात फिनाईल प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना शनिवारी दुपारी चार वाजता घडली.

कर्जदारांच्या तगाद्याने जळगावात तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
जळगाव : व्यवसायासाठी व्याजाने घेतलेली रक्कम परत केल्यानंतरही जागा बळकावण्याची धमकी दिली जात असल्याने पवन युवराज निकम (वय २९, रा.मुक्ताईनगर, जळगाव) या तरुणाने राहत्या घरात फिनाईल प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना शनिवारी दुपारी चार वाजता घडली. पवन याला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
याबाबत पवनचा भाऊ योगेश निकम याने पत्रकारांना दिलेली माहिती अशी की, पवन याचा फुले मार्केटमध्ये सौंदर्यप्रसाधन व रेडीमेट कपडे विक्रीचा व्यवसाय आहे. सौंदर्य प्रसाधनाचे स्वत:चे दुकान आहे तर रेडीमेड कपड्यांची विक्री ही फुटपाथवर केली जाते. व्यवसाय वृध्दीसाठी त्याने अनेक जणांकडून पैसे घेतले होते. ५० लाखाच्यावर ही रक्कम आहे. त्यातील बहुतांश जणांना मुद्दल परत केली आहे, त्याचे व्याज बाकी आहे तर काही जणांची मुद्दलही बाकी आहे. यातील राहूल नावाच्या तरुणाचे व्याजाचे ३८ हजार रुपये घेणे आहे, या पैशासाठी त्याने तगादा लावला. पैसे दिले नाही तर कपड्याचा व्यवसाय करीत असलेली जागा बळकावण्याची धमकी दिली. याशिवाय अन्य लोकांचाही तगादा असल्याने पवन याने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला.