भुसावळ येथे तरुणाने घेतला गळफास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 12:59 IST2018-11-28T12:58:54+5:302018-11-28T12:59:18+5:30
एका झाडाला तरुण गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला

भुसावळ येथे तरुणाने घेतला गळफास
भुसावळ, जि. जळगाव : शहरातील हुडको कॉलनी भागात एका अनोळखी तरुणाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली आहे.
हुडको कॉलनी भागात असलेल्या महादेव मंदिरासमोर एका झाडाला तरुण गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. त्याची ओळख पटली नव्हती. पोलीस अधिक तपास करीत आहे.