एरंडोल तालुक्यातील जवखेडे खुर्द येथे युवकाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2019 18:43 IST2019-12-13T18:41:47+5:302019-12-13T18:43:07+5:30
जवखेडे खुर्द येथे समाधान कपूर पाटील (वय २०) या तरुणाने राहत्या घरात छताच्या लोखंडी कडीला दोरीने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली.

एरंडोल तालुक्यातील जवखेडे खुर्द येथे युवकाची आत्महत्या
एरंडोल, जि.जळगाव : तालुक्यातील जवखेडे खुर्द येथे समाधान कपूर पाटील (वय २०) या तरुणाने राहत्या घरात छताच्या लोखंडी कडीला दोरीने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. आत्महत्येमागील कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. समाधान हा एरंडोल विद्यालयात एस.वाय.बी.ए.चा विद्यार्थी होता. ही घटना शुक्रवारी रात्री घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, समाधानची आई छायाबाई पाटील तसेच आजी इंदुबाई पाटील हे जवखेडे खुर्द येथे राहत्या घरात झोपलेले होते आणि समाधान हा मागील खोलीत झोपलेला होता. त्याला उठविण्यासाठी त्याच्या आईने दरवाजा ठोठावला व आवाज दिला. परंतु काही एक प्रतिसाद न मिळाल्यामुळे खोलीचा दरवाजा तोडण्यात आला. तेव्हा समाधान लोखंडी कडीला दोरीने गळफास घेतलेल्या स्थितीत लटकलेला दिसला. हा प्रकार पहाताच आईने हंबरडा फोडला. त्याचा मृतदेह खाली उतरविण्यात आला. गावातील सोपान पाटील याच्या रिक्षात टाकून एरंडोल येथे ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मृत घोषित केले.
याबाबत एरंडोल पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस कॉन्स्टेबल राजू पाटील व श्रीराम पाटील तपास करीत आहे