एरंडोल तालुक्यात युवकाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2019 00:05 IST2019-02-21T00:05:19+5:302019-02-21T00:05:44+5:30

एरंडोल : येथे म्हसावद रस्त्यालगत पद्मालय फाटा परिसरातील चहा हॉटेल चालक मोहन सुकदेव पाटील (वय ३० वर्षे) याने एका ...

Youth suicide in Erandol taluka | एरंडोल तालुक्यात युवकाची आत्महत्या

एरंडोल तालुक्यात युवकाची आत्महत्या

एरंडोल : येथे म्हसावद रस्त्यालगत पद्मालय फाटा परिसरातील चहा हॉटेल चालक मोहन सुकदेव पाटील (वय ३० वर्षे) याने एका हॉटेलच्या मागच्या भागात असलेल्या झोपडीमध्ये खाट विणण्याच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी सकाळी साडे नऊ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.
याबाबत एरंडोल पोलीस स्टेशनला उमर्दे येथील विजय गणसिंग पाटील यांनी खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृत हा विजय पाटील याच्या मावस भाऊ आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

Web Title: Youth suicide in Erandol taluka

टॅग्स :Jalgaonजळगाव