तापी नदी पुलावरून युवकाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 14:13 IST2019-06-17T14:13:19+5:302019-06-17T14:13:54+5:30

भुसावळ येथे घटनास्थळी गर्दी : फैजपूर पोलीसात मृत्यूची नोंद

Youth suicide due to Tapi river bridge | तापी नदी पुलावरून युवकाची आत्महत्या

तापी नदी पुलावरून युवकाची आत्महत्या


फैजपूर/भुसावळ : तापी नदी पात्रात एका ३२ वर्षीय तरुणाने उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. ही घटना रविवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली. आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव विलास भिवसेन तायडे (कोळी )असे असल्याचे फैजपूर पोलिसांनी सांगितले.
तालुक्यातील कसवा कठोरा येथील रहिवासी विलास तायडे या तरुणाने भुसावळ येथे तापी नदीच्या पुलावरून (गाळा क्र. पाच) खाली उडी घेऊन आत्महत्या केली. या घटनेप्रकरणी यावल तालुक्यातील अकलूद येथील पोलीस पाटील किरण वानखडे यांनी खबर दिल्यावरून पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम हे करीत आहेत. दरम्यान, आत्महत्येमागील कारण समजू शकले नाही.

Web Title: Youth suicide due to Tapi river bridge