पाचोरा, जि.जळगाव : श्रावण महिन्याचा पहिला सोमवार, नागपंचमी अशा शुभमुहूर्तावर पाचोरा येथील संत गाडगेबाबा नगर व भास्करनगरमधील तरूणांनी शिवरत्न फाऊंडेशन नावाने संस्था निर्माण केली. संस्थापक अध्यक्ष जगदीश पाटील, उपाध्यक्ष सतीश देशमुख, सदस्य प्रवीण पाटील, तुषार पाटील, वाल्मीक शाहपुरे, प्रवीण विश्वास पाटील यांनी या संस्थेच्या माध्यमातून संत गाडगेबाबा नगर व भास्करनगरमधील तरूणांना एकत्र करून वृक्ष लागवडीचे काम हाती घेतले.सर्व मित्रांच्या मदतीने ३०० वृक्षांचे रोपण केले. नुसते वृक्षारोपणच नाही प्रत्येक रोपांना ट्री गार्ड लावले व याकामी गाडगेबाबा नगर व भास्करनगरमधील युवकांनी वर्गणी गोळा केली. त्यात जितू साळवे, सतीश देशमुख, डॉ.सचिन पाटील, जगदीश युवराज पाटील, आनंद खैरनार, नागणे, राजू साळुंखे, पेंढारकर, पवन विष्णू पाटील, किरण गंगाराम पाटील यांनी मदत केली.वृक्षारोपणासाठी विजय खरोटे, विजय सोनवणे, गणेश सोनार, भिवसने बाबा, छोटू पाटील, दीपक जाधव यांनी श्रमदान केले. कॉलनीवासीयांच्या सहकार्यामुुळे वृक्षारोपणाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमासाठी नगराध्यक्ष संजय गोहिल, उपाध्यक्ष शरद पाटे, राष्ट्रवादी गट नेते संजय ओंकार वाघ, भाजपचे अमोल शिंदे, पो.नि.शिंदे उपस्थित होते.
पाचोरा येथे युवकांनी केले ३०० वृक्षांचे रोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2019 14:58 IST
पाचोरा येथील संत गाडगेबाबा नगर व भास्करनगरमधील तरूणांनी एकत्र करून वृक्ष लागवडीचे काम हाती घेतले.
पाचोरा येथे युवकांनी केले ३०० वृक्षांचे रोपण
ठळक मुद्देघेतली संगोपनाची घेतली शपथकॉलनीवासीयांचे सहकार्य