‘युथ फॉर ग्लोबल पीस’ हा लोकोपयोगी उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:00 IST2021-02-05T06:00:33+5:302021-02-05T06:00:33+5:30

फोटो नंबर : ०१ सीटीआर२३ लाेकमत न्यूज नेटवर्क जळगाव : युवा वर्गास शांततेच्या मार्गाने नेऊन सकारात्मक व्यक्तिमत्त्व घडविणाऱ्या ब्रह्माकुमारीज् ...

‘Youth for Global Peace’ is a public initiative | ‘युथ फॉर ग्लोबल पीस’ हा लोकोपयोगी उपक्रम

‘युथ फॉर ग्लोबल पीस’ हा लोकोपयोगी उपक्रम

फोटो नंबर : ०१ सीटीआर२३

लाेकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : युवा वर्गास शांततेच्या मार्गाने नेऊन सकारात्मक व्यक्तिमत्त्व घडविणाऱ्या ब्रह्माकुमारीज् युवा प्रभागाचा ‘युथ फॉर ग्लोबल पी’ उपक्रम स्तुत्य आणि अनुकरणीय असल्याचे प्रतिपादन पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांनी केले. जागतिक शांततेसाठी ब्रह्माकुमारीज् युवा प्रभागातर्फे राष्ट्रीय पातळीवर अभियान राबविले जात असून त्याचा शुभारंभाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

डॉ. प्रवीण मुंडे, ब्रह्माकुमारी मीनाक्षी दीदी, डॉ. किरण पाटील, संदीप भाई यांच्या हस्ते अभियानाचा शुभारंभ झाला. त्या पार्श्वभूमीवर शहरात शांती यात्रा काढण्यात आली. ब्रह्माकुमारीज् युवा प्रभागातर्फे २०२१ हे वर्ष विश्व शांतीसाठी युवक अर्थात् यूथ फॉर ग्लोबल पीस म्हणून जगभरात साजरे केले जात आहे. १२ जानेवारीपासून या उपक्रमाची सुरुवात झालेली असून १२ ऑगस्ट अर्थात आंतर राष्ट्रीय युवक दिवसापर्यंत या प्रंकल्पाअंतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

फोटो आहे.

Web Title: ‘Youth for Global Peace’ is a public initiative

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.