चाळीसगावला विहीरीत आढळला तरुणाचा मृतदेह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 12:03 IST2018-02-22T11:59:05+5:302018-02-22T12:03:23+5:30
घरातून होता बेपत्ता

चाळीसगावला विहीरीत आढळला तरुणाचा मृतदेह
आॅनलाईन लोकमत
चाळीसगाव, जि. जळगाव, दि. २२ - घरातून कोणाला काहीही न सांगता निघून गेलेल्या संदीप उत्तम राजपूत या २५ वर्षीय युवकाचा मृतदेहच गुरुवारी सकाळी हनुमानवाडी परिसरातील डोळ्यांच्या धर्मांथ दवाखान्याच्या विहीरीत आढळला. संदीप हा बुधवारी त्याच्या संजय गांधी नगरातील घरातून कोणासही काहीही सांगून न जाता निघून गेला होता.
गुरुवारी सकाळी त्याचा चुलतभाऊ व इतर नातेवाईक संदीपचा शोध घेत असताना विहीरीजवळ त्यांना त्याची चप्पल दिसली. विहीरीत शोध घेतला असता संदीपचा मृतदेह त्यांना आढळून आला. विहीर जुनी असून पाणी व गाळही मोठ्या प्रमाणात आहे. चाळीसगाव शहर पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस नाईक प्रेमसिंग राठोड पुढील तपास करीत आहे.