शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्हा क्रीडा संकुलातील जलतरण तलावात बुडून युवकाचा मृत्यू

By विलास.बारी | Updated: June 18, 2023 21:05 IST

पोहणाऱ्यांच्या गर्दीत मित्रांच्याही आले नाही लक्षात : क्रीडा संकुलातील दुसरी घटना

जळगाव : छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलातील जलतरण तलावात बुडून एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळी ५ वाजता घडली. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलिस स्टेशनमध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सलमान शकील बागवान (वय २४, रा. जोशीपेठ, बागवान वाडा) असे मृत झालेल्या युवकाचे नाव आहे.

सलमान बागवान गेल्या अनेक वर्षांपासून फळ विक्रीचा व्यवसाय करीत होता. बागवान वाड्यात आई, वडील शकील बागवान, मोठा भाऊ व तीन बहिणींसोबत तो राहत होता. रविवारी फळ विक्रीचा व्यवसाय बंद असल्याने, सलमान सुटीच्या निमित्ताने सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास मित्रांसोबत जलतरण तलावात पोहायला आला होता. त्यातच रविवारची सुटी असल्याने जलतरण तलावात पोहणाऱ्यांची संख्यादेखील जास्त होती. मित्रांसोबत पोहत असतानाच सलमान तलावातील जास्त खोलीच्या भागात पोहोचला व त्याठिकाणी खोलीचा अंदाज न आल्यामुळे तो बुडाला.

सलमान बुडत असल्याचे काही मित्रांच्या लक्षात आले. जलतरण तलावातील सुरक्षारक्षकांना बोलावून सलमानला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्याठिकाणी डॉक्टरांनी सलमानला मृत घोषित केले. जिल्हा रुग्णालयात जोशी पेठ व बागवान वाड्यातील सलमानचे नातेवाईक व मित्रांनी मोठी गर्दी केली होती.

प्रशिक्षकांच्या दुर्लक्षामुळे मृत्यू झाल्याचा आरोप

जलतरण तलावाच्या ठिकाणी दररोज अनेक मुलं पोहायला येतात. त्यामुळे याठिकाणी प्रशिक्षकांनी व्यवस्थित लक्ष दिले पाहिजे होते, असे मत सलमानच्या नातेवाईकांनी व्यक्त केले. तसेच जलतरण तलावाच्या ठिकाणावरील बचाव कर्मचारी, सुरक्षारक्षक मोबाइलमध्ये व्यस्त होते. तसेच प्रशिक्षकांच्या दुर्लक्षामुळेच हा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. दरम्यान, क्रीडा संकुलातील जलतरण तलावात बुडून मृत्यू झाल्याची ही दुसरी घटना आहे.

टॅग्स :JalgaonजळगावDeathमृत्यूSwimmingपोहणे