नशिराबाद येथे नैराश्यातून तरुणाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2018 11:50 IST2018-06-17T11:50:30+5:302018-06-17T11:50:30+5:30

मुलाचा मृतदेह पाहताच आईने फोडला हंबरडा

Youth commits suicide in Nashik | नशिराबाद येथे नैराश्यातून तरुणाची आत्महत्या

नशिराबाद येथे नैराश्यातून तरुणाची आत्महत्या

ठळक मुद्देअत्यंत मनमिळावू स्वभावलग्नासाठी मुलींचाही शोध

जळगाव /नशिराबाद : नशिराबाद येथील रहिवासी असलेल्या राहुल राजेश महाजन (२४) या तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नसले तरी नैराश्यातून त्याने आत्महत्या केली असल्याचे सांगितले जात आहे.
नशिराबाद येथे आपल्या आईसह राहत असलेला राहुल महाजन हा मिळेल ते काम करून उदरनिर्वाह करीत असे. त्याच्या वडिलांचे निधन झालेले असून एक विवाहित बहिण असल्याचे सांगण्यात आले. राहुलचे लग्न करायचे असल्याने त्याच्यासाठी मुलीचा शोधही घेतला जात होता, अशी माहिती मिळाली.
शनिवारी दुपारी आई बाहेर गेलेली असताना घरात कोणीही नव्हते, त्या वेळी राहुलने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. दुपारी दोन वाजेच्या सुमारास त्याची आई घरी आली असता हा प्रकार लक्षात आला. मुलाचा मृतदेह पाहताच आईने हंबरडा फोडला. या वेळी शेजारील मंडळींनी पोलिसांना माहिती दिली व राहुलचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलिवण्यात आला.
अत्यंत मनमिळावू स्वभाव
राहुल हा अत्यंत मनमिळावू स्वभावाचा होता. मिळेल ते काम करण्यास त्याने कधी नकार दिला नाही. आता त्याच्या लग्नासाठी मुलींचाही शोध घेतला जात होता, अशी माहिती जिल्हा रुग्णालयात मनसेचे तालुकाध्यक्ष मुकुंद रोटे यांनी दिली.

Web Title: Youth commits suicide in Nashik