जळगावात तरुणाची राहत्या घरात आत्महत्या; कारण अस्पष्ट
By सुनील पाटील | Updated: July 17, 2022 23:58 IST2022-07-17T23:50:01+5:302022-07-17T23:58:35+5:30
Jalgaon : सुनील पाटील हा आई-वडील, भाऊ, पत्नी यांच्यासह वास्तव्याला होता. फोटो लॅबमध्ये काम करुन कुटुंबाला हातभार लावत होता.

जळगावात तरुणाची राहत्या घरात आत्महत्या; कारण अस्पष्ट
जळगाव: कानळदा रस्त्यावरील त्रिभुवन कॉलनीत सुनील देवीदास पाटील (वय३३) या तरुणाने राहत्या घरात वरच्या मजल्यावर गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी रात्री उघडकीस आली आहे. आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे.
सुनील पाटील हा आई-वडील, भाऊ, पत्नी यांच्यासह वास्तव्याला होता. फोटो लॅबमध्ये काम करुन कुटुंबाला हातभार लावत होता. रविवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घराच्या वरच्या मजल्यावर झोपायला जातो असे सांगून गेला. बराच वेळ झाला तरी सुनील खाली न आल्याने वडील त्याला बोलवण्यासाठी गेले असता, सुनील याने गळफास घेतल्याचे दिसले.
दरम्यान, सुनील यांना तातडीने खाली उतरून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषित केले. आत्महत्या करण्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसात रात्री उशिरापर्यंत नोंद नव्हती. यावेळी जिल्हा रुग्णालयात नातेवाईक व मित्रमंडळी यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होती. त्याच्या पश्चात वडील देवीदास, आई छाया, पत्नी सोनी, भाऊ अशोक आणि विवाहित बहीण असा परिवार आहे.