आयपीएस बनूनच घरी येईल, असा संदेश पाठवून तरुणीने सोडले वसतीगृह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:28 IST2021-03-04T04:28:04+5:302021-03-04T04:28:04+5:30
जळगाव : मला खूप मोठे व्हायचे आहे, परंतु कुटुंबातील सदस्य शिक्षण करु देत नाहीत. मला आयपीएस बनायचे आहे, मोठी ...

आयपीएस बनूनच घरी येईल, असा संदेश पाठवून तरुणीने सोडले वसतीगृह
जळगाव : मला खूप मोठे व्हायचे आहे, परंतु कुटुंबातील सदस्य शिक्षण करु देत नाहीत. मला आयपीएस बनायचे आहे, मोठी नोकरी करुनच आता घरी परत येईल, असा व्हाईस मेसेज करुन चारुशिला जगदीश महाजन (१७) या मुलीने वसतीगृह सोडल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत रामानंद नगर पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे.
सावखेडा खुर्द, ता.रावेर येथील शारदा जगदीश महाजन (३३) या मुलीच्या आईने रामानंद नगर पोलीस ठाण्यात सोमवारी तक्रार दिली आहे. त्यांची मुलगी चारुशिला ही जळगाव शहरात शिक्षण घेत आहे. त्याशिवाय तिने खासगी क्लासही लावलेला आहे. लक्ष्मी नगरातील जयंत माधव राणे यांच्या वसतीगृहात ती वास्तव्याला होती. २८ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता तिने मोबाईलवर व्हाईस मेसेज पाठवून कुटुंब शिक्षण करु देत नाही, मला आयपीएस व्हायचे आहे असे सांगून वसतीगृह सोडले. शेतकरी असलेल्या आई, वडिलांना हा प्रकार समजताच त्यांनी रामानंद नगर पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक राजेश शिंदे तपास करीत आहेत.
इन्फो...
उस्मानिया पार्क येथून मुलीला पळविले
दुसर्या घटनेत उस्मानिया पार्क येथून साडे सतरा वर्ष वय असलेल्या मुलीला कोणी तरी फूस लावून पळविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. १ मार्च रोजी सकाळी मुलगी गायब झाली. याप्रकरणी कुटुंबियांनी शहर पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. त्यानुसार मंगळवारी अज्ञात व्यक्तीविरुध्द अपहरणाचा गुन्हा दाखल झालेला आहे. या गुन्ह्याचा तपास उपनिरीक्षक चंद्रकांत पाटील करीत आहेत.