नांद्रा येथील खदाणीत बुडून तरूणाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2019 19:10 IST2019-10-09T19:10:22+5:302019-10-09T19:10:31+5:30

सामनेर, ता.पाचोरा : येथील आसनखेडा रोडवरील खदाणीत पोहण्यासाठी गेलेल्या नांद्रा येथील तरूणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारी ...

 Young woman dies in drowning | नांद्रा येथील खदाणीत बुडून तरूणाचा मृत्यू

नांद्रा येथील खदाणीत बुडून तरूणाचा मृत्यू


सामनेर, ता.पाचोरा : येथील आसनखेडा रोडवरील खदाणीत पोहण्यासाठी गेलेल्या नांद्रा येथील तरूणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली.
ईश्वर सुभाष पाटील (वय ४२) रा. नांद्रा हा मोलमजुरी करून आई व दोन मुलांचा सांभाळ करीत होता. ९ रोजी दुपारी आई रजू मोरे आणि पाच वर्षाचा मुलगा यांच्यासोबत आसनखेडा रोडवरील खदाणीजवळ आंघोळ करण्यासाठी गेला होता. त्यावेळी त्याची आई किना-यावर कपडे धुवत होती. दरम्यान, ईश्वर पाटील पाण्यात पोहत असताना अचानक पाण्यात बुडाल्याने त्यांचा मृत्यू झाला. यावेळी त्यांच्या आईने आरडाओरड केली. शेजारील गुराखी व गावातील तरुणांनी मृतदेह बाहेर काढला. मयत ईश्वरच्या पश्चात आई व दोन मुले असा परिवार आहे. घटनास्थळी पोलीस पाटील किरण तावडे व पाचोरा पोलीस स्टेशनचे नांद्रा बीटचे सहाय्यक फौजदार हिरामन चौधरी व रामभाऊ चौधरी घटनास्थळी दाखल झाले.

Web Title:  Young woman dies in drowning