चोपडा येथे तरुणीची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2021 23:06 IST2021-02-02T23:05:43+5:302021-02-02T23:06:03+5:30
अनंतनगरातील तरुणीने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.

चोपडा येथे तरुणीची आत्महत्या
लोकमत न्यूज नेटवर्क
चोपडा : येथील अनंतनगरातील तरुणी प्रांजली देविदास राजपूत (३१) हिने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.
दि. २ रोजी सकाळी ९.४५ वाजेच्या सुमारास आपल्या राहत्या घरी तरुणीने गळफास घेतल्याची घटना घडली आहे. ही बाब कुटुंबातील सदस्यांच्या लक्षात येताच तात्काळ उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल आले. डॉ पंकज पाटील यांनी तपासणी केली असता प्रांजलीस डॉक्टरांनी मृत घोषित केले.
याबाबत चोपडा शहर पोलीस ठाण्यात उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. पंकज पाटील यांच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक संतोष पारधी हे करीत आहेत.
दरम्यान प्रांजली हिने आत्महत्या नेमक्या कोणत्या कारणाने केली, हे समजू शकले नाही.