मित्राच्या लग्नाला जाताना दुचाकी घसरुन तरुण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2019 12:10 IST2019-04-28T12:08:15+5:302019-04-28T12:10:10+5:30

म्हसावदजवळ अपघात

Young people killed in a motorcycle when they went to a friend's marriage | मित्राच्या लग्नाला जाताना दुचाकी घसरुन तरुण ठार

मित्राच्या लग्नाला जाताना दुचाकी घसरुन तरुण ठार

जळगाव : कंपनीतील मित्राच्या लग्नाला जाताना दुचाकी घसरुन डोक्याला मार लागल्याने नरेश रघुनाथ पाटील (३२, रा. तानाजी मालुसरे नगर, जळगाव, मुळ रा. निमगाव, ता.यावल) हा तरुण ठार झाल्याची घटना शनिवारी घडली. म्हसावद-बोरनार रस्त्यावर सकाळी साडे अकरा वाजता हा अपघात झाला. दरम्यान, या अपघातात भूषण गोवर्धन महाजन (२४, रा.साकेगाव, ता. भुसावळ) हा जखमी झाला आहे.
नरेश हा जळगावातील कंपनीत कामाला आहे. तेथील मित्राचे शनिवारी बोरनार, ता. जळगाव येथे लग्न होते.त्यासाठी नरेश व भूषण असे दोघंही दुचाकीने जात असताना म्हसावद व बोरनार दरम्यान वळणावर दुचाकी घसरली. त्यात नरेश याच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली. नाकातून रक्त यायला लागले. त्यामुळे त्याला तातडीने खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. उपचार सुरु असताना नरेश याची प्राणज्याते मालवली. तेथून त्याला जिल्हा रुग्णालयात हलविले असता डॉक्टरांनी मृत घोषीत केले.
सहा महिन्यापूर्वीच वडीलांचे निधन
भूषण याच्या वडीलांचे सहा महिन्यापूर्वीच निधन झाले आहे. आता नरेशचा अपघाती मृत्यू झाल्याने कुटुंबावर मोठा आघात कोसळला.त्याच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी व मोठा भाऊ असा परिवार आहे. भाऊ नाशिक येथे तर आई मुळगावी राहते. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. हे.कॉ. सचिन मुंडे व निलेश पाटील यांनी पंचनामा केला.

Web Title: Young people killed in a motorcycle when they went to a friend's marriage

टॅग्स :Jalgaonजळगाव