अवैध मद्यविक्रीची माहिती दिल्याच्या संशयावरून तरुणावर चाकूहल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:18 IST2021-05-27T04:18:11+5:302021-05-27T04:18:11+5:30

शिवाजीनगरातील घटना : खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी फोटो.... जळगाव : अवैध मद्यविक्रीची माहिती पोलिसांना दिल्याच्या संशयावरून ईश्वर नवल वाणी ...

Young man stabbed on suspicion of selling illegal liquor | अवैध मद्यविक्रीची माहिती दिल्याच्या संशयावरून तरुणावर चाकूहल्ला

अवैध मद्यविक्रीची माहिती दिल्याच्या संशयावरून तरुणावर चाकूहल्ला

शिवाजीनगरातील घटना : खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी

फोटो....

जळगाव : अवैध मद्यविक्रीची माहिती पोलिसांना दिल्याच्या संशयावरून ईश्वर नवल वाणी या तरुणावर चाकूहल्ला केल्याची घटना बुधवारी दुपारी शिवाजीनगरातील हुडकोत घडली. या प्रकरणी शहर पोलीस ठाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिवाजीनगर हुडको परिसरात मातोश्री किराणाजवळ राहणाऱ्या मीना रवींद्र जगताप या महिलेच्या घरी ५ दिवसांपूर्वी शहर पोलिसांनी कारवाई केली होती. पोलिसांनी कारवाई करताना, महिलेला तुझ्याबाबत फोटो आणि व्हिडीओ आले असल्याचे तिला सांगितले होते. आपल्याबद्दल फोटो आणि व्हिडीओ वाणी यांनीच पोलिसांना दिल्याच्या संशयावरून मीनाबाई दोन दिवसांपासून ईश्वर वाणी यांच्यासह कुटुंबीयांना शिवीगाळ करीत होते. बुधवारी दुपारी मीनाबाईसह तिच्या मुलाने ईश्वर यांना शिवीगाळ करीत खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिली. शाब्दिक वाद वाढल्याने मीनाबाई हिने ईश्वर यांच्या हाताला चावा घेतला, तर मुलाने चाकूने हल्ला केला. ईश्वर यांना छातीवर आणि हातावर जखम झाली असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Young man stabbed on suspicion of selling illegal liquor