क्रिकेटच्या वादातून जळगावात तरुणास चाकूने भोसकले

By Admin | Updated: May 4, 2017 17:38 IST2017-05-04T17:38:38+5:302017-05-04T17:38:38+5:30

राष्ट्रीय महामार्गावरील घटना. खिशातील 31 हजाराची रोकड हिसकावल्याचा आरोप

The young man stabbed with a knife in cricket | क्रिकेटच्या वादातून जळगावात तरुणास चाकूने भोसकले

क्रिकेटच्या वादातून जळगावात तरुणास चाकूने भोसकले

 जळगाव, दि.4- क्रिकेटच्या सामन्यात अंतिम विजेत्याची रक्कम द्यावी या कारणावरून चार जणांनी फिरोज खान नईन खान (वय 38 रा.दत्त नगर, मेहरुण, जळगाव) या तरुणास चाकूने भोसकल्याची घटना गुरुवारी सकाळी महामार्गावरील रिलायन्स पेट्रोलपंपाजवळ घडली. हल्लेखोरांनी खिशातील 31 हजार रुपयाची रोकडही हिसकावून नेल्याची तक्रार खान याने केली आहे.

मौलाना अब्दुल कलाम वेल्फेअर एज्युकेशन या संस्थेतर्फे 8 ते 11 एप्रिल या कालावधित रायसोनी नगरात क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. या सामन्यात 32 संघांनी सहभाग नोंदविला होता. 
गुरुवारी जोशीवाडीत कामाला जाण्यासाठी रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ टायरच्या दुकानात सहका:यांची प्रतीक्षा करीत असताना खलील शेख उस्मान, पहेलवान व अन्य दोन अशा चार जणांनी येऊन फिरोज याच्या पोटावर चाकूने हल्ला केला. फिरोज याला रक्ताच्या थारोळ्यात पाहून अफसर अब्बास शेख, आसिफ युनूस शेख व जाकीर ठेकेदार यांनी त्याला रिक्षातून जिल्हा रुग्णालयात हलविले. एमआयडीसी पोलीस स्टेशनचे कॉन्स्टेबल संजय भोई यांनी रुग्णालयात येऊन जखमीचा जबाब नोंदविला.

Web Title: The young man stabbed with a knife in cricket