जळगावात तरुणाचा चाकूने भोसकून खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2019 12:47 IST2019-09-21T12:46:49+5:302019-09-21T12:47:09+5:30
भररस्त्यावर थरार : जिल्हा रुग्णालयात तणावाची स्थिती

जळगावात तरुणाचा चाकूने भोसकून खून
जळगाव : पुतणीची छेड का काढतो, याचा जाब विचारल्याचा राग मनात धरुन अमोल उर्फ कार्तिक नाना मराठे (सोनवणे) व अरुण नाना मराठे (रा.खेडी बु, ता.जळगाव) या दोघांनी विपीन दिनकर मोरे (३५, रा.खेडी बु.ता.जळगाव) या तरुणाचा चाकूने भोसकून खून करण्यात आला. महामार्गावर खेडी पेट्रोलपंपाच्या समोर ही घटना घडली. या घटनेत विपीन याच्या डाव्याबाजूने छातीत, काखेच्या खाली व उजव्या बाजूला कमरेजवळ भोसकण्यात आले आहे.