भुसावळ :-शहरामध्ये भरवस्तीत कोळीवाड्यात साकेगाव येथील दूध व्यवसाय करणाऱ्या युवकाचा डोक्यावर रॉडने तीन वार करीत खून करण्यात आला. ही थरारक घटना २ रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास घडली.या घटनेने शहर हादरले असून या खळबळजनक घटनेबाबत माहिती अशी की, दूध वाटप करणारा साकेगावचा युवक नसीर बशीर पटेल (३९) हा संध्याकाळी कोळीवाड्यात दूध वाटप करण्यास गेला असता धिरज गणेश शिंदे या युवकाने नसीर पटेल यांच्या डोक्यामध्ये तीन वेळा लोखंडी रॉडने वार केल्यामुळें नसीर जागेवरच गतप्राण झाला. धिरज हा लगेचच पसार झाला असून या खुनामागे अनैतिक संबंधाचे कारण असावे, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. नसीर याच्या पश्चात वडील, भाऊ, बहीण, पत्नी, दोन मुले, दोन मुली असा परिवार आहे.घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन राठोड, बाजार पेठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दिलीप भागवत, वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सतिश सुरडकर यांच्यासह नगरसेवक गिरीश महाजन सतीश सपकाळे युवराज पाटील हे घटनास्थळी दाखल झाले.एक तास मृतदेह जागेवरचघटना घडल्यापासून शववाहिका लवकर न आल्यामुळे मृतदेह घटनास्थळी तब्बल एक तासापासून पडून होता. एका तासानंतर मृतदेह हलविण्यात आला.
भुसावळला भरवस्तीत तरुणाचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2020 22:32 IST